Type Here to Get Search Results !

"पेण–वाशी नाक्यावर सिलिंडरच्या टेम्पोला भीषण आग; सिलिंडर स्फोटाने परिसरात खळबळ"

 



पेण / प्रतिनिधी : वैष्णवी माळी.

                पेण–वाशी नाक्याजवळ सिलिंडर वाहतूक करणाऱ्या टेम्पोला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीत टेम्पोमधील एका सिलिंडरचा जोरदार स्फोट झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.




             प्राथमिक माहितीनुसार, सिलिंडर घेऊन जाणारा टेम्पो पेण–वाशी नाक्याजवळ असताना अचानक टेम्पोच्या इंजिन भागातून धूर निघू लागला. काही क्षणातच आगीने टेम्पोला वेढले. आगीत असलेल्या सिलिंडरपैकी एक सिलिंडर फुटल्याने आगीची तीव्रता वाढली.




           घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असले तरी टेम्पो मोठ्या प्रमाणात जळून खाक झाला आहे. या घटनेमुळे काही काळ पेण–वाशी मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.


          घटनेची नोंद पोलीस प्रशासनाने घेतली असून आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास सुरू आहे.

Post a Comment

0 Comments