Type Here to Get Search Results !

"रिक्षा चालकांनी देशभक्तीचा आदर्श घालून दिला; खोपोलीत २६ जानेवारी उत्साहात साजरा"

 


            खोपोली :  परमेश्वर भि कट्टीमणी : देशाचा २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन खोपोली शहरात विविध स्तरांतून उत्साहात साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा स्टँड, जुना हॉस्पिटल रोड येथील रिक्षा चालकांनी पुढाकार घेत प्रजासत्ताक दिन साजरा करून समाजासमोर देशभक्तीचा आदर्श निर्माण केला.




         रिक्षा चालकांनी एकत्र येत ध्वजारोहण केले. यावेळी राष्ट्रगीताचे सामूहिक गायन करण्यात आले. ध्वजारोहणाचा मान रिक्षा चालक जितेंद्र थोरवे यांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना उजाळा देत संविधानाचे महत्त्व सांगण्यात आले. देशाची एकता, अखंडता व सार्वभौमत्व जपण्याची शपथ सर्व रिक्षा चालकांनी घेतली.




         दररोज सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेत कार्यरत असतानाही रिक्षा चालकांनी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी दाखवलेला उत्साह नागरिकांच्या कौतुकाचा विषय ठरला आहे.




         याचबरोबर खोपोली नगर परिषदेच्या शाळेमध्येही प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, भाषणे सादर करत कार्यक्रमात रंगत आणली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना संविधान, लोकशाही मूल्ये व नागरिकांची कर्तव्ये याबाबत मार्गदर्शन केले.


         रिक्षा चालक व नगर परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे खोपोली शहरात यंदाचा प्रजासत्ताक दिन सामाजिक बांधिलकी आणि देशप्रेमाचा संदेश देणारा ठरला.

Post a Comment

0 Comments