Type Here to Get Search Results !

"राज्यातील निवडणुकीप्रमाणेच जिल्हा परिषद निवडणुकीतही महायुतीचा विजय निश्चित – आमदार महेंद्र थोरवे."

 

.   


खालापूर / प्रतिनिधी : शिवाजी जाधव.

               महाराष्ट्र राज्यात सध्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांचे वातावरण तापले असून, नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीच्या उमेदवारांनी घवघवीत यश संपादन केले आहे. नगरपरिषद व महानगरपालिका निवडणुकांमध्ये महायुतीला मोठा जनसमर्थन लाभल्याने, येणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही महायुतीचाच विजय होईल, असा विश्वास कर्जत–खालापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महेंद्र थोरवे यांनी व्यक्त केला आहे.


         रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका जाहीर झाल्या असून, दि. ५ फेब्रुवारी रोजी मतदान तर दि. ७ फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे. निवडणुकीसाठी कालावधी कमी असल्याने सर्वच उमेदवारांनी प्रचारासाठी कंबर कसल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे.


         खालापूर तालुक्यात यावेळी परिवर्तन विकास आघाडी व महायुती यांच्यात थेट लढत पाहायला मिळणार असून, कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विविध पक्षांचे अधिकृत उमेदवार जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत.


        महायुतीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल करताना भाजप, शिवसेना व आरपीआय महायुतीचे अनेक मान्यवर नेते उपस्थित होते. यामध्ये आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार महेंद्र थोरवे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.


        यावेळी बोलताना आमदार महेंद्र थोरवे म्हणाले की, “राज्यात झालेल्या निवडणुकांप्रमाणेच पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही महायुतीचा विजय निश्चित आहे.”

Post a Comment

0 Comments