Type Here to Get Search Results !

"वरदविनायक महड मंदिरात गणेशोत्सवाला सुरुवात, पहिल्याच दिवशी शेकडो भाविकांची गर्दी"




         

महड : (परमेश्वर भि कट्टीमणी) : महड येथील अष्टविनायक प्रसिद्ध वरदविनायक गणपती मंदिरात गणेशोत्सवाला भक्तिभावात सुरुवात झाली. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. महडसह परिसरातून तसेच राज्याच्या विविध भागांतून आलेल्या शेकडो भाविकांनी वरदविनायकाचे दर्शन घेतले.

 



         पहाटे पारंपरिक धार्मिक विधी, अभिषेक व महाआरतीने गणेशोत्सवाचा प्रारंभ करण्यात आला. मंदिर परिसरात “गणपती बाप्पा मोरया”च्या जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले होते. दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.


       भाविकांच्या सोयीसाठी मंदिर प्रशासनाकडून दर्शन रांग, सुरक्षा व्यवस्था व स्वच्छतेचे योग्य नियोजन करण्यात आले आहे. आगामी दिवसांत भाविकांची संख्या अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.




         वरदविनायकाच्या चरणी भाविकांनी सुख-समृद्धी, आरोग्य व मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना केली.

Post a Comment

0 Comments