अंबरनाथ : (प्रतिनिधी) : अंबरनाथ येथील धर्मवीर आनंद दिघे सभागृह येथे वाईस ऑफ मीडियाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य आरोग्य शिबिराचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.
या वेळी वाईस ऑफ मीडियाचे कोकण प्रदेशाध्यक्ष अरुणजी ठोंबरे यांच्या हस्ते पत्रकार शिवाजी जाधव यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडत सातत्याने सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या कार्याची दखल घेऊन हा सन्मान करण्यात आला.
आरोग्य शिबिराच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला व आवश्यक मार्गदर्शन देण्यात आले. वाईस ऑफ मीडियाच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून विशेष कौतुक करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वाईस ऑफ मीडियाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजहिताचे कार्य पुढेही सुरू राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Post a Comment
0 Comments