Type Here to Get Search Results !

*संघर्षातून गरुड झेप घेणारे युवा पत्रकार..*

       

 


*मुख्य संपदक तय्यब भाई खान यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..*


                खोपोली :  (परमेश्वर भि कट्टीमणी) :  पत्रकाराला बातमी करण्यासाठी, स्वतः बातमीत उतरावं लागतं. पत्रकार हा समाजात वावरत असताना विविध गोष्टी व साहित्य निर्माण करणारा वास्तववादी साहित्यिकच असतो. निःपक्ष व निर्भीडपणे सत्य मांडण्यासाठी समाजावर, गोरगरिबांवर, स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी वृत्तपत्राची आवश्यकता असते. याची जाणीव जाणीव लहानवयातच *पत्रकार तय्यब भाई खान यांना झाली होती..* अत्यंत हलकीच्या  परिस्थितीतून मिळेल ते काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असताना , कोवळ्या वयात तय्यब भाई यांना शहाणपण सुचले. जोखिम स्विकारलेल्या परिस्थितीमुळे खऱ्या अर्थाने, आजुबाजुला घडणाऱ्या ताज्या घडामोडी व बातम्या समाज पटलावर पेरण्यासाठी वृत्तपत्रांची गरज असते. या जाणिवेतून त्यांनी स्वतःच्या बहुजन संकल्प या साप्ताहिका पासून लिखाण सुरू केले, अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम नेहमी करत असतात. त्यांची दूरदृष्टी वाखाणण्याजोगी आहे.  ध्येयवाद, अभ्यासू , सत्यनिष्ठ, निर्भीडता, , जिज्ञासावृत्ती, मनमिळाऊ स्वभाव, चारित्र्य संपन्न व प्रेरणादायी असे गुणवैशिष्ट्ये त्यांच्या अंगी असल्याने त्यांनी मागे वळून पाहिले नाही. साप्ताहिक बहुजन संकल्प सुरू असताच, सध्याचा सोशल मीडियाचा जमाना असल्याचे लक्षात ठेऊन, त्यांनी रायगड संकल्प न्यूज या यूट्यूब चॅनेलवर बातम्या प्रसिद्ध करण्यास सुरूवात केली. रायगड जिल्ह्यातील खोपोली , खालापूर , कर्जत परिसरातील ज्या काही घटना घडामोडी घडतात त्या दिवस भराच्या घडामोडी संकलन करुन, एवढ्या वरच गप्प न बसता, पोलिस ठाणे , पंचायत समिती , तहसील कार्यालय , नगरपरिषद कार्यालय यासह इतर प्रशासकीय कार्यालयात, जनतेच्या आलेल्या तक्रारी संदर्भात, अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून बोलून तक्रारीचे, अडचणीचे निवारण करतात. सत्य शोधण्यासाठी बातमीचा पाठलाग करणारा पत्रकार म्हणून मुख्यसंपदक तय्यबभाई खान यांची ख्याती आहे. अन्यायाविरुद्ध झुंज देणारा झुंजार पत्रकार असे त्यांना संबोधले जाते. कमी वयात सुरू केलेली त्यांची पत्रकारिता आज संपूर्ण ठिकाणी पोहचली आहे. पत्रकारिता करत असताना पूर्वी त्यांना अनेक अडचणी व संघर्षाचा सामना करावा लागला होता . त्या सर्व संघर्षांचा सामना करुन आजच्या घडीला तय्यब भाई यांनी गरुड झेप घेतली आहे. तय्यब भाई खान आणि त्यांचे सहकारी पत्रकार मित्र आकाश जाधव यांचे सर्वत्र आदराने नाव घेतले जाते. त्यामुळे सर्व क्षेत्रात त्यांच्या मानसन्मानात प्रचंड वाढ झाली आहे. 


 *तय्यब भाई खान यांची प्रगती अशीच पुढेही होत राहो ह्याच त्यांना यथार्थ न्युज कडून शुभेछ्या..*

Post a Comment

0 Comments