*तीस लाख रुपये खर्च करून बनवलेले प्रवेशद्वार दहा ते बारा वर्षातच झाले जीर्ण*
खोपोली: (प्रतिनिध ): नगरपरिषद नागरिकांच्या सेवेसाठी आहे की फक्त ठेकेदारांच्या सेवेसाठी आहे हा खूप मोठा गंभीर प्रश्न आहे.खोपोली शहराचे प्रवेशद्वार अखेरची घटका मोजत आहे. सदर प्रवेशद्वारावर प्रचंड प्रमाणात गवत उगवलेले आहे तसेच त्याचे स्लॅब चे तुकडे पडत आहेत. प्रवेश द्वारा खालून जाणाऱ्या एखाद्या व्यक्तीच्या डोक्यात स्लॅबचा तुकडा पडल्यास जीवित हानी होण्याची दाट शक्यता आहे.
नगरपरिषद प्रशासन हे फक्त ठेकेदारांसाठीच काम करते की काय अशी शंका निर्माण होत आहे. नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा दिल्या जात नाही. नागरिकांचे कराचे पैसे ह्या मोठ्या मोठ्या वास्तू बनवण्यासाठी खर्च केले जातात परंतु त्या वास्तूंची निगा राखली जात नाही त्या वास्तूंची देखभाल केली जात नाही. खोपोली शहरातील सर्व प्रवेशद्वारांची अतिशय बिकट अशी अवस्था झालेली आहे.
जेव्हा आम्ही लोकांना आश्वासित करतो घरपट्टी अर्धी आणि पाणीपट्टी कमी करू तर आमचे विरोधक बोलतात आपण हे कसे करू शकता ?नगरपरिषद प्रशासन हे नागरिकांच्या करावर चालत असते. परंतु अमाप पैसा हा टक्केवारी मध्ये आणि भ्रष्टाचारामध्ये व्यर्थ जात असतो तो जर पैसा वाचवला तर आपण नक्कीच नागरिकांची घरपट्टी आणि पाणीपट्टी मध्ये सूट देऊ शकतो. परंतु नगर परिषद प्रशासन फक्त नागरिकांचे कर वसुलीवर लक्ष देत असते त्याकरिता विशेष मोहीम राबवते परंतु नागरिकांना सुविधा मात्र देत नाहीत असे आम आदमी पार्टी खोपोली प्रदेश संघटन सचिव डॉक्टर पठाण यांनी सांगितले.
आगामी निवडणुकीत खोपोली शहरातील नागरिकांनी आम आदमी पार्टीला एक हाती सत्ता दिली तर आम्ही नक्कीच एक प्रगतिशील शहर कसा असावा हे दाखवू व शहराला जगातील नंबर एकच्या दर्जाचा शहर बनवू तशा प्रकारचं आमच्याकडे व्हिजन आहे असे आम आदमी पार्टी खोपोली शहर अध्यक्ष ग्यासुद्दीन खान यांनी सांगितले.



Post a Comment
0 Comments