खोपोली |( प्रतिनिधी) : खोपोली शहरातील शास्त्रीनगर भागात आज दुपारी साडेतीनच्या सुमारास माणुसकीलाच काळिमा फासणारी घटना घडली आहे. रिक्षा चालवत असताना रिक्षाचालक जनार्दन पोपट वाघ (वय ६१, रा. वासरंग) यांना अचानक चक्कर आल्याने ते रिक्षाच्याच स्टिअरिंगवर कोसळले.
त्या वेळी जवळ असलेले गुरुनाथ साठेलकर (HELP Foundation), दर्शन शेडगे, शिबू शेख, आणि हस्तिमल दुकानातील कामगार यांनी तातडीने धाव घेत वाघ यांना खोपोली नगरपरिषद रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केलं. 💔
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे — घटनास्थळापासून काही अंतरावर असलेल्या रिक्षा स्टँडवर १५ पेक्षा अधिक रिक्षाचालक उभे असूनही, कोणीही मदतीसाठी पुढे आले नाही.
गुरुनाथ साठेलकर यांनी सांगितले,
“आज माणुसकीचा पराभव झाल्यासारखं वाटलं. ज्याने आयुष्यभर इतरांना मदत केली, त्याला शेवटच्या क्षणी कुणीच साथ दिली नाही.”
दरम्यान, निलेश यादव यांनी रिक्षा युनियन ग्रुपवर मेसेज टाकल्यानंतर सर्व रिक्षाचालक हॉस्पिटलकडे धावले, पण तोवर खूप उशीर झाला होता.
या घटनेने खोपोली शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
जनार्दन वाघ यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

Post a Comment
0 Comments