Type Here to Get Search Results !

*खालापूर तालुक्यातील नांवडे ग्रामस्थांचा शिवसेना (शिंदे गट) मध्ये जाहीर प्रवेश*

  


           कर्जत : (प्रतिनिधी )मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विकासाचे नवे पर्व सुरू झाले असून, ग्रामीण भागातील जनतेचा वाढता विश्वास आता शिवसेना (शिंदे गट) कडे वळताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर खालापूर तालुक्यातील नांवडे गावातील अनेक ग्रामस्थांनी शिवसेना (शिंदे गट) मध्ये जाहीर प्रवेश करून पक्षाची ताकद वाढवली आहे.


         हा प्रवेश सोहळा गुरुवार, दिनांक ७ नोव्हेंबर रोजी कर्जत येथील आमदार कार्यालय, शिवसेना भवन येथे आमदार महेंद्र थोरवे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रसंगी गावातील अंकुश हाडप, शिवाजी हाडप, श्रीकांत हाडप, प्रकाश हाडप तसेच अन्य अनेक ग्रामस्थांनी शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला.


      प्रवेश सोहळ्यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांनी नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक स्वागत करताना सांगितले की, “शिवसेना ही जनतेच्या विश्वासाची आणि विकासाच्या राजकारणाची ताकद आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी ओळखून विकासाचा आराखडा तयार केला असून गावपातळीवरही हे बदल दिसून येत आहेत,” असे मत त्यांनी व्यक्त केले.


       अंकुश हाडप यांनी सांगितले की, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विकासाचे नवे पर्व सुरू झाले आहे. त्यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून आम्ही सर्व ग्रामस्थांनी शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील काळात पक्ष बळकट करण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र येऊन काम करू,” असे त्यांनी स्पष्ट केले.


        या कार्यक्रमास शिवसेना पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्ष बळकट करण्यासाठी व विकासाच्या वाटचालीत सहभागी होण्यासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.


        कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित कार्यकर्त्यांनी “जय महाराष्ट्र” आणि “एकनाथ शिंदे जिंदाबाद” अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्थानिक कार्यकर्त्यांनी केले.

Post a Comment

0 Comments