Type Here to Get Search Results !

*खोपोली वॉर्ड क्रमांक १० मधून सुशांत शिवाजी जाधव निवडणुकीच्या रिंगणात; समाजकार्यातून घडलेले तरुण नेतृत्व*

 
 


       

खोपोली : (प्रतिनिधी) – खोपोली शहरातील वॉर्ड क्रमांक १० मध्ये आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीत स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणणारे आणि समाजकार्यातून नाव कमावलेले तरुण नेते सुशांत शिवाजी जाधव आता अधिकृतपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. स्थानिक तरुणांमध्ये लोकप्रिय आणि नागरिकांशी थेट संवाद साधणाऱ्या या युवकाला जनतेचा वाढता प्रतिसाद मिळत असून, त्यांची उमेदवारी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.


          लहानपणापासूनच सामाजिक आणि लोकहिताच्या कार्यात सक्रिय असलेले सुशांत जाधव यांनी आपले बालपण साध्या परिस्थितीत व्यतीत केले. घरातील जबाबदाऱ्या लहान वयातच स्वीकारत त्यांनी शिक्षण १२ वी पर्यंत पूर्ण केले. त्यानंतर नोकरी आणि छोटा व्यवसाय करत असताना त्यांनी आपली सामाजिक वाटचाल थांबू दिली नाही. परिसरातील गरीब, शेतकरी, विद्यार्थी, तसेच कामगार वर्गाच्या प्रश्नांसाठी ते नेहमी पुढे सरसावत असतात.


      त्यांचे वडील शिवाजी जाधव हेही एक ओळखलेले समाजसेवक असून त्यांनी वर्षानुवर्षे लोकांसाठी निस्वार्थ सेवा बजावली आहे. वडिलांच्या कार्यातून प्रेरणा घेत सुशांत यांनीही सामाजिक कार्यात पाऊल टाकले आणि आज वॉर्डातील अनेक रहिवाशांच्या समस्या सोडवण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे.


      सुशांत जाधव यांच्या कार्यात स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, वीजपुरवठा तसेच युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे या मुद्यांवर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. अनेक वेळा नगरपरिषद व प्रशासन यांच्याकडे नागरिकांच्या मागण्यांसाठी त्यांनी पाठपुरावा केला असून, त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे काही प्रश्नांना तोडगा निघाल्याचे स्थानिक नागरिक सांगतात.


      वॉर्डातील वृद्ध, महिला आणि युवक यांचा त्यांना चांगला पाठिंबा मिळत आहे. "सुशांतभाऊ आमच्यातलेच आहेत, त्यांनी कधीही आपला अहंकार दाखवला नाही. गरज भासल्यावर नेहमी हजर असतात," असे मत वॉर्डातील काही ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केले.


       निवडणुकीत उतरतानाच सुशांत जाधव यांनी ‘सामाजिक न्याय आणि विकास’ हा आपला मुख्य मुद्दा ठरवला आहे. “वॉर्ड क्रमांक १० मध्ये अजूनही अनेक मूलभूत सुविधा नागरिकांना मिळत नाहीत. स्वच्छ रस्ते, चांगला पाणीपुरवठा, युवकांना रोजगार, महिलांसाठी सुरक्षितता आणि वृद्धांसाठी आरोग्य सुविधा या सर्व गोष्टींसाठी मी कटिबद्ध आहे. जनतेचा पाठिंबा आणि आशीर्वाद मिळाला, तर वॉर्ड आदर्श बनवण्याचे स्वप्न मी पूर्ण करीन,” असे ते म्हणाले.


      युवकांच्या सहभागातून समाजकारणात बदल घडवण्याच्या त्यांच्या भूमिकेचे स्वागत अनेकांनी केले आहे. “सुशांत जाधव यांच्यासारखे तरुण राजकारणात आले पाहिजेत. प्रामाणिक, मेहनती आणि सेवाभावी वृत्ती असलेले लोकच खरं लोकप्रतिनिधित्व करू शकतात,” असे मत वॉर्डातील एका महिलांनी व्यक्त केले.


       खोपोली नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीत वॉर्ड क्रमांक १० मधील चुरस अधिक वाढण्याची शक्यता असून, स्थानिकांमध्ये चर्चेचा विषय म्हणजे सुशांत जाधव यांचा प्रभाव वाढत चाललेला आहे. जनतेशी थेट संपर्क, सोप्या भाषेत संवाद आणि प्रत्यक्ष काम करण्याची तयारी या गुणांमुळे त्यांना ‘जनतेचा माणूस’ म्हणून ओळख मिळत आहे.


      आगामी काही दिवसांत ते प्रचाराची औपचारिक सुरुवात करणार असून, आपल्या कार्याचा आलेख आणि भविष्यातील विकास आराखडा मतदारांसमोर मांडण्याची तयारी सुरू आहे. जनतेतून उमटणाऱ्या सकारात्मक प्रतिसादामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

Post a Comment

0 Comments