*युवा उपस्थिती आणि सेलिब्रिटी गेस्ट्समुळे खोपोलीत उत्साहाचे वातावरण*
खोपोली : (शिवाजी जाधव) : वरची खोपोली परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या “छावा लुक्स – द परफेक्ट मेन्स वेअर” या आधुनिक फॅशन दालनाचा भव्य उद्घाटन सोहळा रविवारी, दि. २३ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६:३० वाजता मोठ्या जल्लोषात संपन्न झाला. नव्या पिढीच्या फॅशनची उत्कृष्ट संगती देणाऱ्या या स्टोअरच्या उद्घाटनाला स्थानिक नागरिकांसह सोशल मीडिया स्टार्स, कलाकार व युवकांचा मोठा सहभाग लाभला. संपूर्ण परिसरात उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण करून हा सोहळा विशेष ठरला.
उद्घाटन सोहळ्यात रिल्सवर लोकप्रिय असलेले कु. बंटी म्हात्रे, कु. जयेश शिंदे, कु. सोहन म्हात्रे, कु. मानसी आंबावले, कु. रितू गायकवाड, कु. साहिल माळी, कु. ओम तायडे, कु. योगेश ठोंबरे आणि कु. जयेश लीमकर यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यांच्या उपस्थितीमुळे तरुणाईत विशेष उत्साह पाहायला मिळाला. सेलिब्रिटींच्या भेटीगाठीसाठी विद्यार्थी आणि युवकांनी मोठी गर्दी केली होती.
याशिवाय मराठी मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री कु. पूजा बंदरकर यांची उपस्थितीही कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरली. त्यांच्या आगमनाने कार्यक्रमाचा माहोल अधिक रंगतदार झाला. मराठी संगीत विश्वातील उदयोन्मुख गायक कु. प्रथमेश गायकवाड यांनी उपस्थित राहून आयोजकांचे अभिनंदन केले. तर कु. यश जाधव यांनीही आपले विशेष उपस्थितीचे अभिवादन करून दालनाला शुभेच्छा दिल्या.
नवीन स्टोअरचे आतील सजावट, आकर्षक लाईटिंग, आधुनिक फॅशन कलेक्शन आणि परफेक्ट फिटिंगची हमी यामुळे उपस्थित पाहुण्यांनी समाधान व्यक्त केले. मेन्स फॅशनमध्ये ट्रेंडी सूट्स, पार्टीवेअर, इंडो-वेस्टर्न, कॅज्युअल कलेक्शन, फेस्टिव्हल स्पेशल्स अशा विविध वयोगट आणि आवडीप्रमाणेची उत्पादने उपलब्ध करून देण्याची संकल्पना नागरिकांच्या पसंतीस उतरली. उद्घाटनाच्या निमित्ताने विशेष सवलतींसह उपलब्ध केलेल्या फॅशन कलेक्शनचीही युवकांनी मोठी उत्सुकता दाखवली.
दालनाने तरुणाईला फॅशनच्या माध्यमातून नवी ओळख आणि व्यक्तिमत्त्व वृद्धिंगत करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. उद्घाटन सोहळ्याचे नियोजन, पाहुण्यांचे स्वागत, व्यवस्थापन आणि पाहुणचार याबाबत आयोजकांनी केलेल्या उत्तम व्यवस्थेचे सर्वत्र कौतुक झाले. स्थानिक पातळीवर मेन्स फॅशन क्षेत्रात हा दालन नव्या युगाची सुरुवात करेल, असा विश्वासही उपस्थितांनी व्यक्त केला.

Post a Comment
0 Comments