Type Here to Get Search Results !

खोपोली नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५, अध्यक्षपदासाठी किशोर साळुंके यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

 


           खोपोली | प्रतिनिधी : खोपोली नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, आज (दि. १५ नोव्हेंबर २०२५) अध्यक्षपदासाठी महत्त्वाचे दावेदार किशोर साळुंके यांनी आपला अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या उपस्थितीत पूर्ण शिस्तबद्ध पद्धतीने हा अर्ज सादर करण्यात आला.

 


         अर्ज दाखल केल्यानंतर बोलताना साळुंके म्हणाले, “खोपोलीच्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक, उत्तरदायी आणि जनतेच्या हिताचे काम करणे माझे प्राधान्य राहील. नागरिकांच्या मूलभूत सुविधा, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, सुरक्षितता आणि वाहतुकीचे प्रश्न सोडवण्यासाठी ठोस पावले उचलणार आहोत.”


        त्यांनी पुढे सांगितले की, युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे, महिलांसाठी सुरक्षित वातावरण तयार करणे आणि खोपोलीतील औद्योगिक–व्यापारिक वाढीसाठी योग्य धोरणे राबविणे हा त्यांच्या निवडणूक प्रचाराचा प्रमुख भाग असेल. “महिला बचतगट, सामाजिक संघटना, तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करणे हीच खरी लोकसेवा आहे,” असेही त्यांनी नमूद केले.


      अर्ज दाखल करताना अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समर्थक उपस्थित होते. खोपोली शहरातील राजकीय वातावरणाला यामुळे अधिक वेग आला असून आगामी दिवसांत निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहे.

Post a Comment

0 Comments