पुणे :( विशेष पतिनिध ) : सामाजिक प्रश्न, अन्यायाविरुद्ध लढा आणि जनतेचा आवाज बनून सातत्याने काम करणारे पत्रकार फिरोज बशीर पिंजारी यांना ‘Lifetime Achievement in Journalism Award 2025’ हा प्रतिष्ठित सन्मान जाहीर झाला आहे. हा पुरस्कार KPM Media and Tech LLP तर्फे आयोजित ‘भारत उद्योगरत्न पुरस्कार 2025’ सोहळ्यात १२ ऑक्टोबर २०२५ रोजी पुण्यात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
पत्रकारितेच्या क्षेत्रात मागील १७ वर्षांपासून सक्रिय असलेले पिंजारी यांनी लोकशाहीच्या बळकटीसाठी व समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी प्रभावी माध्यम बनले आहेत. कोकण प्रदेश न्यूज व कोकण लाईव्ह या वृत्तसंस्थांमधून त्यांनी कार्य करताना नेहमीच सत्य, पारदर्शकता आणि सामाजिक जबाबदारीचे भान ठेवले.
*शिक्षण आणि सामाजिक जबाबदारी*
फिरोज पिंजारी यांनी Mass Communication and Journalism मध्ये एम.ए. आणि राज्यशास्त्रात बी.ए. शिक्षण घेतले आहे. त्यांच्या लेखनातून सामाजिक भान, प्रामाणिकता आणि सामान्य नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष वेधले गेले आहे. “पत्रकार म्हणजे जनतेचा आवाज” या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी पत्रकारितेला लोकहिताचे शस्त्र बनवले आहे.
*पुरस्काराचे महत्व*
* KPM Media चा गौरव संदेश*
संस्थेच्या वतीने सांगण्यात आले की, “फिरोज पिंजारी यांनी सत्याचा आवाज बुलंद ठेवून समाजाला विचार करण्यास भाग पाडले आहे. त्यांच्या कार्यातून महाराष्ट्रातील पत्रकारितेला नवीन दिशा मिळाली आहे.”
*पत्रकारितेतील आदर्श व्यक्तिमत्व*
फिरोज पिंजारी यांच्या लेखनशैलीतून समाजातील सत्य मांडण्याचे, न्याय मिळवून देण्याचे आणि लोकशाही सशक्त करण्याचे कार्य सातत्याने होत आले आहे. त्यांचा हा सन्मान म्हणजे संपूर्ण पत्रकार बिरादरीसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.


Post a Comment
0 Comments