Type Here to Get Search Results !

*महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी भव्य सर्वपक्षीय मोर्चा - तुषार तानाजी कांबळे*

 


         मुंबई : (प्रतिनिधी) : महाबोधी महाविहार हे बौद्ध धर्मातील सर्वात पवित्र आणि ऐतिहासिक तीर्थस्थान असून आजही ते बौद्ध समाजाच्या ताब्यात नाही. या ऐतिहासिक आणि न्याय्य मागणीसाठी १४ ऑक्टोबर २०२५ रोजी राणीचा बाग (भायखळा) येथून आझाद मैदान, मुंबई पर्यंत एक भव्य सर्वपक्षीय मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.



      हा मोर्चा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे राष्ट्रीय अध्यक्ष मा. डॉ. रामदास आठवले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे.

     देशभरातून बौद्ध अनुयायी, आंबेडकरी कार्यकर्ते, मातंग समाजाचे प्रतिनिधी, भिक्खू संघ आणि विविध सामाजिक संघटना या ऐतिहासिक आंदोलनात सहभागी होणार आहेत.



                     तुषार तानाजी कांबळे यांचे वक्तव्य :


> “मी स्वतः मातंग समाजातील एक कार्यकर्ता असून या न्यायाच्या लढ्यात अभिमानाने सहभागी होत आहे.

मातंग समाजाने सदैव समता, न्याय आणि बंधुतेसाठी संघर्ष केला आहे.

आज पुन्हा एकदा आपण सर्व बुद्ध अनुयायी, आंबेडकरी समाज आणि सामाजिक न्यायावर विश्वास ठेवणारे कार्यकर्ते एकत्र येऊन आपला आवाज बुलंद करायचा आहे.

महाबोधी महाविहार बौद्ध समाजाच्या ताब्यात देणे हीच खरी श्रद्धांजली आणि न्यायाची स्थापना ठरेल.”


                  सर्वपक्षीय आवाहन :


तुषार कांबळे यांनी सर्व मातंग समाजातील बांधवांना, तसेच सर्व बुद्ध अनुयायी, आंबेडकरी कार्यकर्ते आणि सामाजिक न्यायावर विश्वास ठेवणारे नागरिक यांना १४ ऑक्टोबर रोजीच्या या ऐतिहासिक मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.


                     ते पुढे म्हणाले –

 

      “हा आंदोलन कोणत्याही एका समाजाचा नसून, तो न्याय, समता आणि बौद्ध वारशाच्या सन्मानाचे प्रतीक आहे.

     म्हणूनच मी सर्व राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि जनप्रतिनिधी यांना आवाहन करतो की, पक्षभेद विसरून या आंदोलनात सहभागी व्हा आणि बौद्ध समाजाच्या या न्याय्य लढ्याला बळ द्या.”


       “महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यातच हवा — हीच श्रद्धा, हा हक्क, आणि हीच बौद्ध समाजाची न्यायाची लढाई आहे!”

Post a Comment

0 Comments