Type Here to Get Search Results !

*भाविकांच्या सुरक्षेसाठी तात्काळ पावले उचला — खोपोलीत छठपूजेची तयारी जोरात, पण नदीपात्रात कचऱ्याचे साम्राज्य*

 

खोपोली : (प्रतिनिधी): आगामी चार दिवसांत खोपोली शहरात छठपुजेचा भव्य सोहळा पार पडणार आहे. दरवर्षीप्रमाणे यावेळीही हजारो भाविक पाताळगंगा नदीपात्रावर मोठ्या श्रद्धेने छठपूजा करणार आहेत. शहरातील विविध भागांतून तसेच आसपासच्या गावांमधूनही नागरिक या धार्मिक उत्सवासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.


      मात्र सध्या पाताळगंगा नदीपात्र परिसरात प्रचंड प्रमाणात गवत वाढलेले असून ठिकठिकाणी घाण, प्लास्टिक व इतर कचरा साचला आहे. त्यामुळे छठपूजेच्या निमित्ताने येणाऱ्या भाविकांना मोठा त्रास होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नदीकिनाऱ्यावरील ही अस्वच्छता आरोग्याच्या दृष्टीनेही धोकादायक ठरू शकते.




        या पार्श्वभूमीवर नागरिक व सामाजिक संघटनांनी खोपोली नगर परिषद प्रशासनाकडे तात्काळ लक्ष देण्याची मागणी केली आहे. विशेषतः म्हणजे डॉ. रियाज पठाण यांनी स्वतः पुढाकार घेऊन नदीपात्र परिसरातील गवत, कचरा व घाण याची तातडीने साफसफाई करावी, अशी मागणी होत आहे.


      भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता पूजास्थळी प्रकाशव्यवस्था, सुरक्षिततेसाठी पोलिस बंदोबस्त, तसेच वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे.




     नागरिकांचे म्हणणे आहे की, दरवर्षी हा सण अत्यंत भक्तिभावाने साजरा होतो. त्यामुळे यावर्षी प्रशासनानेही तितक्याच तत्परतेने नियोजन करून भाविकांना सुरक्षित, स्वच्छ आणि सुव्यवस्थित वातावरणात छठपूजा करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी.

Post a Comment

0 Comments