Type Here to Get Search Results !

खालापूर उपजिल्हा रुग्णालयाचे काम लवकर सुरू करा अन्यथा आंदोलन : आप*

    
.  

    उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग यांना देण्यात आलेले निवेदन. 


       

खालापूर : प्रतिनिधी : खालापूर तालुका हा या राज्यातील सर्वात मोठा घाट क्षेत्र असलेला तालुका आहे. खंडाळा घाटात प्रचंड प्रमाणात अपघात होत असतात. तालुक्यात एकही अत्याधुनिक सरकारी रुग्णालय नसल्याकारणाने अपघात ग्रस्तांना उपचाराकरिता मुंबई अथवा पुणे येथे घेऊन जावे लागते. 

 


         खालापूर तालुक्यात उपजिल्हा रुग्णालय मंजूर झालेले असून सुद्धा अजूनही सदर रुग्णालयाचे काम सुरू झालेले नाही त्याकरिता आम आदमी पार्टी सतत पाठपुरावा करत असून रुग्णालय तातडीने सुरू करण्यात यावे अन्यथा आम आदमी पार्टीतर्फे उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग खालापूर यांच्या कार्यालयाच्या समोर उपोषण करण्यात येईल असा इशारा आम आदमी पार्टी प्रदेश संघटन सचिव डॉ पठाण यांनी दिला आहे.

 



     खंडाळा घाटात एक्सप्रेस हायवे असेल किंवा जुना राष्ट्रीय महामार्ग असेल येथे प्रचंड प्रमाणात अपघात होत असतात रुग्णांना तातडीची सेवा मिळावी याकरिता पालीफाटा येथे उपजिल्हा रुग्णालय तातडीने बनविणे गरजेचे आहे त्या अनुषंगाने शासनाने पावले उचलावे असे आम आदमी पार्टी खोपोली शहराध्यक्ष ग्यासुद्दीन खान यांनी सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments