दि. ६ ऑक्टोबर २०२५ महाराष्ट्रातील प्रभावशाली, युवा व बहुआयामी सामाजिक आणि राजकीय नेते तुषार तानाजी कांबळे,
( मुंबई) : प्रतिनिधी: महाराष्ट्र प्रदेश सचिव – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) श्रमिक ब्रिगेड यांनी आज मुंबई येथे कायदेतज्ञ अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या कार्यालयात विशेष भेट घेऊन सामाजिक, न्यायविषयक आणि संविधानिक मुद्यांवर सखोल चर्चा केली.
या भेटीदरम्यान समाजातील वंचित आणि दुर्लक्षित घटकांच्या प्रश्नांवर तसेच आदिवासी जमिनींवरील अतिक्रमण , शेतकऱ्यांच्या जमिनीवरती बिल्डरने केलेला अतिक्रमणाच्या गंभीर विषयावर विस्तृत विचारविनिमय झाला. समाजातील न्याय, अधिकार आणि शिक्षण यासाठी एकत्रित सामाजिक व कायदेशीर चळवळ उभारण्याचा निर्धार दोघांनी व्यक्त केला.
तसेच येत्या काळात “वकील संवाद मेळावा” आयोजित करण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली. या मेळाव्यात राज्यातील प्रमुख वकील, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार सहभागी होऊन संविधानिक मूल्ये, सामाजिक न्याय आणि आदिवासी हक्क या विषयांवर सखोल विचारमंथन करतील.
या प्रसंगी सागर जगताप (अध्यक्ष, संविधान संघटना) हे देखील उपस्थित होते.
या भेटीनंतर तुषार तानाजी कांबळे यांनी सांगितले —
> “संविधानाचे रक्षण, सामाजिक न्यायाची अंमलबजावणी आणि आदिवासी समाजाचे अधिकार यासाठी ठोस कृती आवश्यक आहे. सदावर्ते सरांसारखे निर्भीड कायदेतज्ज्ञ समाजातील अन्यायाविरुद्ध निडरपणे आवाज उठवतात; आणि आपण सर्वांनी मिळून त्या लढ्याला नवे बळ द्यायचे आहे.”
या भेटीमुळे महाराष्ट्रातील सामाजिक आणि न्यायविषयक चळवळींना नवा वेग आणि दिशा मिळेल, असा विश्वास विविध सामाजिक संघटनांनी व्यक्त केला आहे.



Post a Comment
0 Comments