खोपोली : (प्रतिनिधी) : खोपोली शहरातील शिळफाटा येथील खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत असलेल्या सह्याद्री शाळेच्या गरीब विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांकडून दहा हजार रुपये प्रत्येकी इमारत निधीच्या नावाने देणगी मागण्यात येत आहे याबाबत काही पालकांनी आम आदमी पार्टी कडे तक्रार दिलेली आहे.
गरीब कष्टकरी कामगारांची मुले सह्याद्री शाळेमध्ये शिकत असतात व त्यांच्या पालकांकडून किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून अशा प्रकारे देणगी मागणे हे खूप चुकीचे आहे व मुलांवर अन्याय आहे. तरी अशा प्रकारे कोणतीही देणगी मुलांच्या नातेवाईकांकडून मागू नये याकरिता आम आदमी पार्टी तर्फे खालापूर तालुका गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार देण्यात आलेली आहे असे आप प्रदेश संघटन सचिव डॉक्टर पठाण यांनी सांगितले.
सह्याद्री शाळा ही गरिबांची शाळा आहे. सदर शाळेमध्ये शिक्षण घेऊन गरीब घराची मुलांनी आपले आयुष्य उज्वल केले आहे. अशा शाळेच्या प्रशासकांमार्फत विद्यार्थ्यांकडून देणगी मागणे हे उचित नाही असे आम आदमी पार्टी खोपोली शहर अध्यक्ष ग्यासुद्दीन खान यांनी सांगितले.


Post a Comment
0 Comments