रायगड (प्रतिनिधी) –महाराष्ट्र राज्यात ‘विजिलन्स अवेअरनेस वीक’ निमित्त पार पडलेल्या शपथवचन कार्यक्रमात न्यूज जर्नलिस्ट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार फिरोज पिंजारी यांनी म्हटले की, “प्रामाणिकतेशिवाय लोकशाही अपूर्ण आहे. पत्रकारिता ही केवळ बातम्या देण्याचे काम नाही, तर ती लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजातील पारदर्शकतेची ताकद आहे.”
या कार्यक्रमाचे आयोजन 27 ऑक्टोबर 2025 रोजी करण्यात आले. महाराष्ट्रातील सर्व पत्रकार, प्रशासकीय अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या शपथवचन उपक्रमाचा उद्देश भ्रष्टाचारमुक्त आणि जबाबदार कार्यसंस्कृतीची जपणूक करणे हा होता.
शपथवचनातील प्रमुख मुद्द्यांमध्ये नैतिक व्यावसायिक पद्धतींचा प्रसार, प्रामाणिकतेची संस्कृती जोपासणे, लाच न देणे किंवा स्वीकार न करणे, तसेच पारदर्शकतेवर आधारित सुशासन या तत्त्वांचा अंगीकार करण्यावर भर देण्यात आला. सर्व कर्मचाऱ्यांसाठी ‘Code of Ethics’ लागू करण्याबरोबरच ‘Whistle Blower’ आणि तक्रार निवारण यंत्रणा सक्रिय करण्याचेही ठरविण्यात आले.
पत्रकार फिरोज पिंजारी यांनी सांगितले की, “सत्य, नीतिमत्ता आणि पारदर्शकतेचा मार्ग कठीण असला तरी, पत्रकार म्हणून समाजासमोर आदर्श निर्माण करणे ही आपली जबाबदारी आहे.” त्यांनी सर्व पत्रकारांना स्वतःपासून भ्रष्टाचारमुक्त व उत्तरदायी पत्रकारितेसाठी कार्य करण्याचे आवाहन केले.
या शपथवचन कार्यक्रमात राष्ट्रीय अध्यक्ष खलील सुर्या, राष्ट्रीय संयोजक डॉ. शरीफ बागवान, राष्ट्रीय कोषाध्यक्ष सुधीर गोविंद माने, राष्ट्रीय महासचिव मानसी कांबळे, राष्ट्रीय सचिव अनिल पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी, पत्रकार आणि तरुणांनी सहभाग घेतला.
हा उपक्रम केंद्रीय भ्रष्टाचार प्रतिबंधक आयोग (CVC) च्या ‘Vigilance Awareness Week’ या उपक्रमाशी सुसंगत असल्याचे आयोजकांनी सांगितले.



Post a Comment
0 Comments