*डॉ सुनील पाटील नगराध्यक्ष पदाचे प्रबळ दावेदार...*
*खोपोली- ( शिवाजी जाधव )* : राष्ट्रवादी कॉग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा खोपोलीचे माजी नगराध्यक्ष डॉ सुनील पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन ताकई येथे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते झाले.
सद्य सगळीकडे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेचे आरक्षण जाहीर झाले असून या निवडणूका कधीही जाहीर होतील यासाठी खोपोलीतील सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चे बांधणी करीत असल्याचे पाहायला मिळत आहे
डॉ सुनील पाटील यांनी नुकताच शिवसेना शिंदे गटातून राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे, त्यांना राष्ट्रवादी कॉग्रेसने प्रदेश उपाध्यक्ष पद दिले आहे तर ते खोपोली नगरीचे माजी नगराध्यक्ष आहेत, त्यांचा खोपोली शहरात दांडगा परिचय असून ते राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षातून नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत,तशी त्यांनी मागणी वरिष्ठाकडे केली आहे, ते खोपोली नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी प्रबळ दावेदार असल्याचे पाहायला मिळत आहे,
या कार्यालयाच्या उदघाटनाला राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील पाटील, राष्ट्रवादी कॉग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे, खालापूर तालूका अध्यक्ष संतोष बैलमारे, महिला नेत्या अश्विनी पाटील, युवा नेते मनीष यादव,रमेश जाधव, निलेश औटी, भूषण पाटील, संदीप पाटील, राहुल जाधव आदिसह अनेक राष्ट्रवादी कॉग्रेसचे पदाधिकारी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment
0 Comments