खोपोली –(परमेश्वर भि कट्टीमणी) : हुशार, दिलदार, दिलखुलास, अभ्यासू आणि रोखठोक व्यक्तिमत्व असलेले, नेहमीच समाजहितासाठी कार्यरत राहणारे, मित्रपरिवाराच्या सुख-दुःखात सदैव धावून जाणारे तसेच निडर पत्रकार म्हणून ओळख असलेले सन्माननीय श्री. सचिनजी यादव यांच्या वाढदिवसानिमित्त शहरासह तालुक्यातील पत्रकार बांधव, सामाजिक कार्यकर्ते आणि मित्रपरिवाराकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
पत्रकारितेत सचिनजी यादव यांनी नेहमीच सत्य, प्रामाणिकपणा आणि निर्भीड भूमिकेवर ठाम राहून समाजातील सामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत अनेकांनी सोशल मीडियावरून व वैयक्तिकरित्या शुभेच्छा संदेश पाठवले आहेत.
* यथार्थ न्यूजचे संपादक परमेश्वर भि. कट्टीमणी यांनी देखील सचिनजी यादव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देताना म्हटले आहे की,*
“सचिनजी हे खरे अर्थाने लोकपत्रकार असून, त्यांच्या लेखणीत समाज परिवर्तनाची ताकद आहे. त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व अधिक यश लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.”
या विशेष दिनानिमित्त सचिनजींचे सहकारी, मित्रमंडळी आणि शुभेच्छुक यांनी त्यांच्याबद्दल मनापासून अभिमान व्यक्त करत .
खोपोली परिसरातील पत्रकारिता क्षेत्रात सचिनजी यादव यांचे योगदान नेहमीच प्रेरणादायी राहिले आहे.


Post a Comment
0 Comments