खोपोली –(परमेश्वर भि कट्टीमणी) : रायगड जिल्ह्यातील पत्रकारिता क्षेत्रात जनसामान्यांचा खरा बुलंद आवाज म्हणून ओळखले जाणारे Raigad 2DAY NEWS चे संपादक चंद्रशेखर रामकृष्ण परब यांचा वाढदिवस २४ ऑक्टोबर रोजी उत्साहात साजरा करण्यात आला.
गेल्या दोन दशकांपासून आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील लोकांचे प्रश्न मांडणारे, अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहणारे आणि सत्याला न्याय मिळवून देणारे नाव म्हणजेच चंद्रशेखर परब. त्यांच्या बातम्यांमुळे अनेक वेळा प्रशासनाला जाग येऊन कारवाई करावी लागली आहे.
पत्रकार परब यांनी ग्रामीण भागातील प्रश्न, बेरोजगारी, आरोग्य, शिक्षण तसेच प्रशासनातील त्रुटी या विषयांवर ठोस भूमिका घेतली. त्यांच्या लेखणीचा आवाज हा नेहमीच जनतेचा आवाज ठरला आहे. सत्याला न्याय मिळवून देणे आणि सामान्य माणसाच्या हक्कासाठी लढा देणे, ही त्यांची पत्रकारितेची खरी ओळख बनली आहे.
त्यांच्या कार्यामुळे अनेक नवोदित पत्रकारांना प्रेरणा मिळाली असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली असंख्य पत्रकार आजही सत्यासाठी निर्भीडपणे लेखणी चालवत आहेत.
या निमित्ताने ‘यथार्थ न्यूज’ चे संपादक परमेश्वर भि. कट्टीमणी यांनी पत्रकार चंद्रशेखर परब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या पुढील आयुष्याला उत्तम आरोग्य, यश आणि दीर्घायुष्य लाभो, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.
रायगड जिल्ह्यातील पत्रकार बांधव, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी सुद्धा परब यांना शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.



Post a Comment
0 Comments