Type Here to Get Search Results !

🗳️ प्रभाग क्रमांक 10 मधील मतदार यादीत 185 मतदारांचे दुबार नाव.....आप.



निवडणूक आयोगाने तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचा आम आदमी पक्षाचा आरोप.


      खोपोली – (प्रतिनिधी ) : आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खोपोली नगर परिषदेने जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीत मोठे घोळ समोर आले आहेत. प्रभाग क्रमांक दहा, शिळफाटा येथील मतदार यादी तपासणी करताना तब्बल 185 मतदारांचे दुबार नाव आढळल्याचे समोर आले आहे. याशिवाय मयत मतदारांची नावे सुद्धा याद्यांमधून वगळण्यात आलेली नाहीत.



      नगर परिषदेने हरकती नोंदविण्यासाठी फक्त पाच दिवसांचा अवधी दिला होता. मात्र, मतदार याद्यांमधील मोठ्या प्रमाणातील त्रुटी लक्षात घेता इतक्या कमी कालावधीत तपासणी करणे अशक्य असल्याचे आम आदमी पक्षाने नमूद केले आहे.


       प्रभाग क्रमांक दहा येथील याद्या दुरुस्त करण्यासाठी आम आदमी पक्षाने जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि निवडणूक आयोगाला पत्र दिले होते. आयोगाने कारवाईचे आश्वासन दिले असले, तरी अजूनही दुरुस्ती झालेली नाही, असा आरोप पक्षाने केला आहे.



       या संदर्भात आम आदमी पार्टी प्रदेश संघटन सचिव डॉ. पठाण यांनी सांगितले की,



    “मूळ प्रारूप मतदार यादीत इतक्या मोठ्या प्रमाणात दुबार व मयत मतदारांची नावे असल्याने मतदान प्रक्रियेत धांदली होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने तत्काळ दुरुस्ती करूनच मतदान घ्यावे.”


     दरम्यान, खोपोली शहरातील काही ग्रामीण भागातील नागरिकांचे मतदान पत्र शहर व ग्रामपंचायत दोन्हीकडे तयार असल्याचे समोर आले आहे. यावर आम आदमी पार्टी खोपोली शहराध्यक्ष ग्यासुद्दीन खान यांनी सांगितले की,


      “ग्रामपंचायत हद्दीत राहणारे काही मतदार नगर परिषद निवडणुकीतही मतदान करत आहेत. या प्रकाराची चौकशी सुरू आहे.”

Post a Comment

0 Comments