कर्जत (प्रतिनिधी) – मध्य रेल्वेच्या कर्जत स्थानकावर १८ सप्टेंबर २०२५ रोजी नियोजित अभियंत्रीकी कामे हाती घेण्यात येणार आहेत. या कामांमुळे कर्जत येथून सुटणाऱ्या काही लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या असून प्रवाशांना याचा मोठा फटका बसणार आहे.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी १०:४५ वाजताची कर्जत–खोपोली लोकल ही सकाळची शेवटची गाडी असेल. त्यानंतर ब्लॉक सुरू होणार असून काम पूर्ण झाल्यानंतरच लोकल सेवा पुन्हा सुरु केली जाणार आहे. ब्लॉक संपल्यानंतर पहिली कर्जत–सीएसएमटी लोकल दुपारी १२:२७ वाजता सुटेल, तर पहिली कर्जत–खोपोली लोकल दुपारी १२:१५ वाजता प्रवासासाठी उपलब्ध असेल.
📌 रद्द होणाऱ्या लोकल गाड्या (१८ सप्टेंबर):
कर्जत–सीएसएमटी लोकल : ११:१६, १२:००, १२:३२, १:००
कर्जत–खोपोली लोकल : ११:००, ११:१५

Post a Comment
0 Comments