सुनील तटकरे यांच्या ऐतिहासिक सत्कार सोहळ्यासाठी रायगड सज्ज
📍 खोपोली प्रतिनिधी : लंडन येथे मिळालेल्या भारत भूषण पुरस्काराने रायगड जिल्ह्याचा सन्मान उंचावणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) यांचे ज्येष्ठ नेते व खासदार मा. सुनील तटकरे यांच्या भव्य सत्कार सोहळ्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. हा ऐतिहासिक सोहळा २१ सप्टेंबर रोजी कर्जत येथे मोठ्या उत्साहात पार पडणार असून, रायगड जिल्ह्याभरातून हजारो कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
या संदर्भात झालेल्या नियोजन बैठकीत अनेक मान्यवर उपस्थित होते. बैठकीस माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रफुल पटेल, रायगडचे समन्वयक रमेश शिर्के, माजी नगरसेवक सुनील शिर्के, महिला नेत्या सुमन मुण्डे, जिल्हा महिला अध्यक्षा उज्वला मुण्डे, नगरसेवक राजेंद्र गायकवाड, अमर कदम, अजय शेलार, विजय खेडेकर, संजय पाटील, नीलेश कदम, महेश पाटील, प्रकाश शिर्के, प्रमोद लाड, खालापूर पंचायत समिती सभापती सुदाम पाटील, खालापूर तालुका अध्यक्ष गोपाळ पाटील, खालापूर युवक अध्यक्ष अमर मानकर, खालापूर शहराध्यक्ष संदीप गायकवाड, तालुका उपाध्यक्ष सचिन गुरव, विजय जगताप, योगेश शिंदे, कुमार पाटील, नितीन मोरे, अशोक मुण्डे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, महिला नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीत बोलताना आयोजकांनी सांगितले की, “सुनील तटकरे हे रायगडच्या मातीतून घडलेले लोकनेते आहेत. त्यांना मिळालेला भारत भूषण पुरस्कार हा केवळ त्यांचा सन्मान नाही, तर संपूर्ण रायगड जिल्ह्याचा अभिमान आहे. त्यामुळे २१ सप्टेंबर रोजी कर्जत येथे होणारा हा सत्कार सोहळा ऐतिहासिक ठरेल.”
बैठकीत कार्यक्रमाच्या आयोजनाची रूपरेषा, कार्यकर्त्यांची जबाबदारी, पाहुण्यांचे स्वागत, सांस्कृतिक कार्यक्रम, महिला व युवकांच्या सहभागाचे नियोजन यावर सविस्तर चर्चा �

Post a Comment
0 Comments