Type Here to Get Search Results !

* खोपोलीत आरपीआय युवक जिल्हा कार्यकरणीची बैठक संपन्न*



     पक्षाच्या वर्धापनदिनाला मोठ्या संख्येने उपस्थित रहा. युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडीक यांचे अवाहन.

               

        खोपोली : ( शिवाजी जाधव ) खोपोली शहरात रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया ( आठवले गटाचा ) ६८ वा वर्धापन दिन महाड येथील क्रांतिभूमीत होत आहे.या वर्धापनदिनाच्या ऐतिहासिक सोहळ्यात युवकांची मोठी उपस्थिती. नोंदविण्यासाठी खोपोली आरपीआय युवक जिल्हा कार्यकरणीची बैठक संपन्न. या बैठकीला जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष, शहर अध्यक्ष यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.पक्षाचा वर्धापनदिन रायगड जिल्ह्यात होत असल्याने. युवक संघटना मोठ्या ताकदीने. कार्यक्रमात पुढे असेल असे मत युवक जिल्हाध्यक्ष. प्रमोद महाडीक यांनी बोलताना व्यक्त केले आहे. शिळफाट्यावरील संगम रिसोर्ट येथील सभागृहात. आरपीआय युवक जिल्हा कार्यकरणीची बैठक जिल्हाध्यक्ष. प्रमोद महाडीक यांच्या अध्यक्षते खाली पार पडली.   

         

      डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेला रिपब्लिकन पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष. रामदासजी आठवले पुढे घेवून जात आहेत. त्यांचे हात बळकट करण्यासाठी युवकांनी पुढे येण्याचे अवाहन. युवक कोकण प्रदेशाध्यक्ष सुशांत सकपाळ यांनी केले. आठवले यांच्या आदेशानुसार रायगडच्या. क्रांतीभूमीत पक्षाच्या वर्धापनदिनाला. महायुतीतील सर्व मंत्री, प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. म्हणून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील युवक. संघटना प्रचंड मेहनत घेत असल्याचे सकपाळ यांनी सांगितले.

       छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीत,महाडच्या क्रांतिभूमीत आरपीआय पक्षाचा ६८ वा वर्धापनदिन साजरा करण्याची जबाबदारी राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले यांनी युवकांवर दिली आहे.कोकण प्रदेश अध्यक्ष प्रकाश मोरे,युवक अध्यक्ष सुशांत सकपाळ,रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहोत.हा दिमाखदार सोहळा यशस्वी करण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत यासाठी गाव बैठका सुरू केल्याचे युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडीक यांनी बोलताना सांगितले.

Post a Comment

0 Comments