📍 खोपोली (परमेश्वर भि कट्टीमणी) : आमदार महेंद्र थोरे फाउंडेशन व खोपोली शहर शिवसेना महिला आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने “नारी वैभव भारत दर्शन नृत्य स्पर्धा” शनिवारी, 13 सप्टेंबर रोजी महाराजा मंगल कार्यालयात पार पडली.
या स्पर्धेत भारत देशातील विविधतेने नटलेली संस्कृती नृत्याच्या माध्यमातून सादर करण्यात आली. महाराष्ट्रातील कोळी, लावणी, आदिवासी, धनगर नृत्य, लोकनृत्य तसेच गुजरात, राजस्थान, आसाम, गोवा, केरळ, पंजाब, काश्मीर, कर्नाटक आदी राज्यांच्या सांस्कृतिक लोकनृत्यांचा मनमोहक आविष्कार महिलांनी सादर केला.
मराठी चित्रपट अभिनेते भाग्यश्री चिरमुल यांनी परीक्षक म्हणून उपस्थिती लावली.
🏆 बक्षिसे व निकाल
प्रथम क्रमांक : खोपोली पंजाबी नृत्य गट – ₹15,000/-
द्वितीय क्रमांक : दुर्गा क्लब खोपोली (राजस्थानी नृत्य) – ₹11,000/-
तृतीय क्रमांक : ओम साई महिला गट (आदिवासी नृत्य) – ₹7,000/-
याशिवाय सहभाग घेतलेल्या सर्व महिला गटांना प्रोत्साहनपर ₹5,000/- देण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनिया रुपवते व माजी नगरसेविका जीनी सॅम्युअल यांनी केले.
🎤 विशेष उपस्थिती
आमदार महेंद्र थोरे यांच्या सौभाग्यवती मिनाताई थोरे, माजी नगरसेविका वनीता काळे, माधवी रिठे, अर्चना पाटील, रुपाली जाधव, प्रिया प्रविण जाधव, कांचनताई जाधव, जयश्री मिंडे, सोनिया रुपवते, अनीता वायकल, जीनी सॅम्युअल, जेबुन्निसा शेख, भावना सूर्यवंशी, पल्लवी देसाई, शहराध्यक्ष संदीप पाटील, डॉ. सुनील पाटील, मोहन ओसारसमल, कुलदीप शेंडे, संतोष मालुसरे, गणेश खानविलकर, दिनेश थोरे, मनोज रिठे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
✨ या नृत्य महोत्सवात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग व प्रेक्षकांची दाद यामुळे कार्यक्रम अत्यंत रंगतदार आणि यशस्वी झाला.

Post a Comment
0 Comments