पिंपरी चिंचवड (प्रतिनिध) : दि.१३ मा. अमित गोरखे साहेब, आमदार – विधान परिषद, महाराष्ट्र राज्य यांची पिंपरी चिंचवड येथील त्यांच्या कार्यालयात सदिच्छा भेट घेण्यात आली. महाराष्ट्र राज्याच्या युवा धोरण समितीवर निमंत्रित सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल आमदार साहेबांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले. युवक, शिक्षण, रोजगार आणि समाजहिताशी संबंधित विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली.
या प्रसंगी उपस्थित होते – कैलास कांबळे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, आरपीआय आठवले मातंग आघाडी, प्रा. रवींद्र आरेकर सर युवा नेतृत्वाला बळकटी देण्यासाठी आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र येण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
मनोगत – तुषार तानाजी कांबळे
सचिव – महाराष्ट्र प्रदेश, आरपीआय (आठवले) श्रमिक ब्रिगेड
“आज आमदार साहेबांना भेटण्याचा योग आला, ही माझ्यासाठी अभिमानाची आणि प्रेरणादायी बाब आहे. महाराष्ट्र राज्याच्या युवा धोरण समितीवर निमंत्रित सदस्य म्हणून त्यांच्या निवडीमुळे युवकांसाठी नवे दरवाजे उघडले आहेत. शिक्षण, रोजगार, कौशल्यविकास आणि समाजाच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांवर सकारात्मक संवाद साधता आला.
नेतृत्वाने लोकांच्या अपेक्षा समजून घेत पुढे जाणे ही काळाची गरज आहे. साहेबांचे दूरदृष्टी असलेले नेतृत्व युवकांसाठी नवा आशावाद निर्माण करणारे आहे. आम्ही समाजाच्या सर्व घटकांसोबत हातात हात घालून शिक्षण, स्वावलंबन आणि समतेसाठी कार्यरत राहू.



Post a Comment
0 Comments