पुणे – प्रतिनिधी: समाज कल्याण क्षेत्रात महाड, रायगडसह ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आज पुणे येथे दिपा मुधोळ – मुंडे, आयुक्त – समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य यांची भेट घेण्यात आली. ही भेट कोकण प्रदेश अध्यक्ष प्रकाशजी मोरे यांच्या नेतृत्वाखाली आणि तुषार तानाजी कांबळे, सचिव – महाराष्ट्र प्रदेश, आरपीआय (आठवले) श्रमिक ब्रिगेड यांच्या सक्रिय सहभागाने पार पडली.
या भेटीत महाड, रायगड येथील विकासासाठी पुढील मागण्या व मुद्द्यांवर निवेदन सादर करण्यात आले – क्रांतीभूमी चवदार तळ्याच्या सुशोभीकरणासाठी, महाडमधील मुलींच्या वसतिगृहासाठी, शिक्षणासाठी आर्थिक मदतीच्या योजना आणि शिष्यवृत्ती, युवकांसाठी कौशल्य प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यासाठी योजना, महिलांसाठी स्वयंरोजगार व बचत गटांसाठी मदत, आरोग्य सेवा आणि पोषण अभियान राबविण्यासंदर्भात.
सविस्तर चर्चा करताना मॅडमने सर्व मुद्दे ऐकून घेत आश्वासन दिले की –
“महाड, रायगड परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी प्राधान्याने कार्यवाही करण्यात येईल. शिक्षण, आरोग्य, महिला व युवकांसाठी प्रभावी योजना राबविण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.”
या वेळी उपस्थित प्रकाशजी मोरे, अध्यक्ष – कोकण प्रदेश, आरपीआय (आठवले), तुषार तानाजी कांबळे, सचिव – महाराष्ट्र प्रदेश, आरपीआय (आठवले) श्रमिक ब्रिगेड, कैलास कांबळे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष – आरपीआय (आठवले) मातंग आघाडी, विलास पाटोळे, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष – आरपीआय (आठवले) श्रमिक ब्रिगेड
तुषार तानाजी कांबळे यांचे मनोगत:
“महाड, रायगडचा विकास हा केवळ मागण्यांचा विषय नाही तर समाजातील प्रत्येक घटकाला न्याय, शिक्षण आणि संधी मिळावी यासाठी एक सामूहिक प्रयत्न आहे. प्रकाशजी मोरे यांच्या नेतृत्वाखाली आणि सर्व सहकाऱ्यांच्या सहकार्याने वंचित, महिला, युवक आणि शेतकरी यांच्या समस्या समजून घेऊन त्यांच्या हक्कासाठी आवाज उठवत आहोत. आज आयुक्त मॅडम यांनी आमच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. आम्ही या कार्याला बांधील राहून पुढील काळात महाड, रायगडच्या प्रगतीसाठी सातत्याने कार्य करणार आहोत.”
प्रकाशजी मोरे यांच्या नेतृत्वाखाली आणि तुषार तानाजी कांबळे यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. सर्व उपस्थितांनी शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि युवक विकासासाठी एकत्रित काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.





Post a Comment
0 Comments