Type Here to Get Search Results !

*खोपोली सायमल गावच्या हद्दीत कुजलेल्या अवस्थेत लावारिस मृतदेह – परिसरात खळबळ*




         खोपोली प्रतिनिधी: (शिवाजी जाधव):  खोपोली शहराच्या सायमल गावच्या हद्दीत मुंबई–पुणे जुन्या महामार्गालगत शिंग्रोबा मंदिराजवळील रोडलगत कुजलेल्या अवस्थेत पुरुष जातीचा एक लावारिस मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सदर मृतदेह खोपोली पोलिसांच्या ताब्यात असून, ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.



      ८ ऑगस्ट २०२५ रोजी ही घटना उघडकीस आली. माहितीप्रमाणे, मृत व्यक्तीचे अंदाजे वय ४० ते ४५ वर्षे असून, अंगात फिकट नारंगी रंगाचा फुल शर्ट, निळ्या रंगाची ट्रॅक पॅन्ट (नाडी असलेली) परिधान केलेली आहे. त्यावर GUCCI असे लिहिलेले आहे. तसेच उजव्या हाताच्या अंगठ्यावर “K L” असे गोंदलेले असून, हातामध्ये “K” अशी नक्षी केलेली गोंदण असल्याचे पोलिसांना आढळले आहे.




     या संदर्भात खोपोली पोलीस ठाणे अंक रजिस्टर क्रमांक ३४/२०२५ भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अंतर्गत नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाची खबर बापूराव राजेंद्र माने (वय ३९, रा. पोहवा/१६०१, मोबाईल: ७७२००७५९५६) यांनी दिली. मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्र, खालापूर येथे दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करून सदर इसमास मृत घोषित केले.


     सद्यस्थितीत मृत व्यक्तीची ओळख पटलेली नाही. पोलिसांकडून त्याच्या वारसांचा शोध घेतला जात आहे. परिसरातील नागरिकांमध्ये या घटनेनंतर भीतीचे व चिंतेचे वातावरण पसरले आहे. कोणीही नागरिकांना या मृत व्यक्तीबाबत माहिती असल्यास तात्काळ खोपोली पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments