Type Here to Get Search Results !

*पत्रकारितेत उत्कृष्ट योगदानासाठी संपादक फिरोज पिंजारी यांना आंतरराष्ट्रीय सन्मान*

   



       खोपोली: (परमेश्वर भि कट्टीमणी) – ज्येष्ठ पत्रकार व संपादक फिरोज बशीर पिंजारी यांना पत्रकारिता व जनसंचार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल Journalism Council तर्फे “Certificate of International Recognition in Journalism & Mass Communication” या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.


     फिरोज पिंजारी हे KP News समूहाचे प्रमुख संपादक असून, दैनिक कोकण प्रदेश न्यूज, दैनिक कोकण प्रजा, KP News Spark, KP News Nation, KP Khandesh Plus News, KP Mystery Cast, कोकण प्रवाह आणि KP News खोपोली अशा अनेक वृत्तपत्रांचे ते संपादक म्हणून कार्यरत आहेत.


     याशिवाय ते DK Foundation व Freedom and Justice या संस्थांचे महाराष्ट्र राज्य डिप्टी चीफ ऑम्बड्समन तसेच News Journalist Association चे अध्यक्ष आहेत. गेली साडे–सतरा वर्षे ते पत्रकारितेत कार्यरत असून या काळात त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण प्रश्न जनतेसमोर आणले आहेत.


    2023 मध्ये पत्रकारितेतील प्रभावी कार्याबद्दल त्यांना राज्यस्तरीय चौथीरंग पुरस्कार देखील मिळाला होता. आता मिळालेला आंतरराष्ट्रीय सन्मान हा त्यांच्या कार्याची दखल घेणारा ठरला आहे.


     पत्रकारिता क्षेत्रातील त्यांचे नेतृत्व, जबाबदारी व समाजाप्रती असलेली बांधिलकी यामुळे पिंजारी यांना हा आंतरराष्ट्रीय मान मिळाल्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments