( प्रतिनिधी) : उरण तालुक्यातील भूमिपुत्रांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात आज कलानगर, बांद्रा कार्यालयात केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे राष्ट्रीय अध्यक्ष मा. डॉ. रामदासजी आठवले साहेब यांची भेट घेण्यात आली.
ही भेट तुषार तानाजी कांबळे, सचिव महाराष्ट्र प्रदेश, आरपीआय (आठवले) श्रमिक ब्रिगेड यांच्या पुढाकारातून घडवून आणण्यात आली. स्थानिक भूमिपुत्रांच्या रोजगाराच्या न्यायासाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेत शिष्टमंडळासह साहेबांना भेट दिली.
स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराच्या संधी नाकारून बाहेरील कामगारांना प्राधान्य दिले जात असल्याची बाब श्री. कांबळे यांनी ठळकपणे मांडली. जेसीबी, डंपर, आरएमसी, लेबर सप्लाय, बांधकाम साहित्य पुरवठा आदी क्षेत्रात काम करण्याची क्षमता असूनही स्थानिकांना व्यवसायातून वंचित केले जात असल्याचे निवेदन सादर करण्यात आले.
या गंभीर प्रश्नाची दखल घेत साहेबांनी क्षणाचाही विलंब न करता थेट संबंधित अधिकाऱ्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि स्पष्ट आदेश दिला – “स्थानिक भूमिपुत्रांनाच काम देण्यात यावे!”
या तात्काळ हस्तक्षेपामुळे श्री. महेश गजानन पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांना न्याय मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
तुषार तानाजी कांबळे यांची प्रतिक्रिया- “उरण तालुक्यातील भूमिपुत्रांचा रोजगार हा फक्त उदरनिर्वाहाचा नव्हे तर स्वाभिमानाचा प्रश्न आहे.
आज मा. डॉ. रामदासजी आठवले साहेबांनी स्वतः पुढाकार घेऊन संबंधित अधिकाऱ्याला आदेश दिल्याने स्थानिकांना न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
स्थानिक भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी व स्वाभिमानासाठी आम्ही सातत्याने ठामपणे लढा देत राहू.”
या प्रसंगी श्री. महेश पाटील, संतोष लोहार, रमेश कडू, जयेश जोशी, साईश कडू आदी मान्यवर उपस्थित होते.





Post a Comment
0 Comments