📍 खोपोली : (परमेश्वर भि कट्टीमणी ) : खोपोली शहरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपले स्वतंत्र स्थान निर्माण करून जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे युवा नेता कुलदीपभाई रामदास शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
कुलदीपभाई शेंडे यांनी नेहमीच समाजकारणाला प्राधान्य देत शैक्षणिक, सामाजिक तसेच नागरी प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने आवाज उठवला आहे. गरजू विद्यार्थ्यांना मदत करणे, गरीब-गरजू नागरिकांच्या अडचणी दूर करणे तसेच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घेऊन समाजसेवेची ओळख निर्माण केली आहे.
शांत, संयमी व कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याने वागणारे कुलदीपभाई शेंडे यांनी युवकांमध्ये नेतृत्वगुण विकसित करून नवा आत्मविश्वास जागवला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम राबवले गेले असून, खोपोलीच्या विकासासाठी त्यांनी केलेले प्रयत्न नेहमीच लोकांच्या कौतुकास पात्र ठरले आहेत.
त्यांच्या कार्यामुळे खोपोली शहरात आज विश्वासाचे व आत्मीयतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिक व विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देत उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना केली आहे.
जनतेचा लाडका युवा नेता म्हणून ओळखले जाणारे कुलदीपभाई शेंडे यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी राहील यात शंका नाही.



Post a Comment
0 Comments