खोपोली : (परमेश्वर भि कट्टीमणी) : खोपोली नगरपरिषद निवडणुकीचे वारे वाहू लागले असून नगराध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवारांची नावे चर्चेत येऊ लागली आहेत. सध्याच्या नगराध्यक्षपदाचा कार्यकाळ संपत आल्याने पुढील नेतृत्व कोणाकडे जाणार याची उत्सुकता वाढली आहे. अशातच शहरात कुलदीपक शेंडे यांच्या नावाला विशेष वेग आला आहे.
शेंडे यांचे वडील रामदास शेंडे हे नगराध्यक्षपद भूषवून गेलेले लोकप्रिय व्यक्तिमत्व होते. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत कुलदीपक शेंडे हे सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात सक्रिय राहून सर्वसामान्यांच्या मनात आपली वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत. लोकसंपर्काची मजबूत पकड, शहरातील प्रत्येक घटकांशी असलेले आत्मीय नाते आणि नागरिकांसाठी केलेली विविध विकासकामे यामुळे त्यांचा नगराध्यक्षपदासाठी दावा अधिक बळकट झाल्याचे बोलले जात आहे.
शहरातील विविध भागात त्यांनी राबवलेल्या उपक्रमांमुळे युवकांमध्ये त्यांना विशेष पाठिंबा मिळत असून, वयोवृद्ध मतदारही त्यांच्याबद्दल सकारात्मक मतप्रदर्शन करत आहेत. शहरातील चौकाचौकांत, तसेच सामाजिक गाठीभेटीत "कुलदीपक शेंडेच पुढील नगराध्यक्ष व्हावेत" अशी मागणी होत असल्याचे स्पष्ट जाणवत आहे.
येत्या निवडणुकीत नगराध्यक्ष पद कोणाला मिळणार हे चित्र अद्याप धूसर असले तरी, कुलदीपक शेंडे यांच्या नावाने चर्चेला आले आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचे प्रयत्न व दृष्टी लक्षात घेता, त्यांना उमेदवारी मिळाल्यास विजयाची संधी प्रबळ असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे.


Post a Comment
0 Comments