Type Here to Get Search Results !

*खोपोली नगर परिषदेच्या इमारतीमध्ये लागलेले सर्व एसी अनाधिकृत : आम आदमी पार्टी.*

   



      *नागरिकांच्या कराच्या पैशातून एसीचे बिल भरू नका सर्व एसी काढा अथवा आंदोलन करणार : आप*


        खोपोली : (प्रतिनिधी) : खोपोली नगर परिषदेच्या इमारतीमध्ये लावण्यात आलेले सर्व एसी हे अनाधिकृत आहेत. तसेच एसी लावण्याकरिता नगर परिषदेने प्रशासनाची परवानगी घेतलेली नाही. तसेच सदर एसी लावण्याकरिता नगर परिषदेमार्फत करण्यात आलेल्या खर्चाचा अहवाल माहितीच्या अधिकाराखाली मागितले असता आमच्याकडे माहिती उपलब्ध नाही असे अजब उत्तर नगर परिषदेने माहितीच्या अधिकाराखाली आम आदमी पार्टीला दिलेले आहे. 

        खोपोली शहरात प्रचंड समस्या असताना नागरिकांच्या कराचे पैसे एसीचे बिल भरण्याकरिता वापरण्यात येत असून शहरात नागरिकांना कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत. शहरात विविध ठिकाणी विजेचे खांबांची आवश्यकता आहे, रस्त्यांची दाणादाण उडालेली आहे, गटारे नाहीत साफसफाई चे तीन तेरा वाजलेले आहेत. या सर्व सुविधा पुरवण्याकरिता आमच्याकडे निधी उपलब्ध नाही असे नगरपरिषदेमार्फत नेहमी उत्तर दिले जात आहे. नगर परिषदेमार्फत निधीचा अपव्यय केला जात असून नागरिकांच्या मूलभूत गरजा पुरवण्याचे सोडून नगर अधिकारी नागरिकांच्या कराच्या पैशाने आरामात एसी  मध्ये बसून मज्जा करत आहेत.



       नगरपरिषद इमारतीतील ब वर्गाच्या अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये सुद्धा नगर परिषदेने एसी लावलेले आहेत व सदर एसी लावण्याकरिता नगर परिषदेने कोणतेही खर्च केलेले नाही असे उत्तर नगर परिषदेने माहितीचे अधिकारातील खाली दिलेले आहे. नागरिकांच्या कराचे पैसे वाया घालवू नये व एसीचे बिल नागरिकांच्या करातून भरू नये अशी मागणी आम आदी पार्टी प्रदेश संघटन सचिव डॉ पठाण यांनी केली आहे. 



     नगरपरिषदेने इमारतीतील सर्व एसी काढावे तथा एसीचे बिल अधिकाऱ्यांच्या पगारातून घेण्यात यावे अन्यथा आम आदी पार्टी तर्फे नगर परिषदेसमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा आम आदमी पार्टी खोपोली शहर अध्यक्ष ग्यासुद्दीन खान यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments