Type Here to Get Search Results !

*खोपोलीत स्वामी प्रतिष्ठानचा उपक्रम : नवरात्र निमित्ताने आदिवासी महिलांना साडी वाटप, आनंदोत्सवाचे वातावरण*

 


खोपोली :  (शिवाजी जाधव) : नवरात्र उत्सव साजरा करण्यासाठी शहरभरात भक्तिमय आणि उत्सवी वातावरण निर्माण झाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर खोपोली शहरातील बस स्टॉपच्या बाजूला बसून वनस्पती व भाजीपाला विकणाऱ्या आदिवासी महिलांना स्वामी प्रतिष्ठान तर्फे साडी वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे मेहनत करून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.

 


    या कार्यक्रमाला स्वामी प्रतिष्ठानच्या प्रियाताई जाधव, कांचनताई जाधव, सोनिया रुपवते, सारिका सावंत यांच्यासह सर्व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. महिलांना साड्या वाटप करताना पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या दैनंदिन संघर्षांबद्दल विचारपूस केली आणि प्रोत्साहनाचे शब्द दिले.




     आदिवासी समाजातील महिला रोजच्या जगण्यासाठी झटत असतात. अशा वेळी नवरात्राच्या मंगल प्रसंगी त्यांना दिलेली ही भेट त्यांच्या दृष्टीने केवळ मदत नाही, तर सण साजरा करण्याची नवी उमेद ठरली. साडी मिळाल्यानंतर आदिवासी महिलांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद झळकला, परिसरात उत्सवी आणि भावनिक वातावरण निर्माण झाले होते.




स्वामी प्रतिष्ठानने नेहमीच समाजातील वंचित घटकांसाठी कार्य केले असून, या उपक्रमाद्वारे प्रतिष्ठानने पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी जपल्याचे स्पष्ट झाले. स्थानिक नागरिकांनीही या उपक्रमाचे कौतुक करत, अशा प्रकारचे उपक्रम सतत राबवावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments