मुंबई : (प्रतिनिधी) : प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई (IMD) कडून दिलेल्या माहितीनुसार राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये २७ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पावसाचा अंदाज :
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा येथे व्यापक पाऊस, तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता.
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसामुळे शहरी पूरस्थिती उद्भवू शकते.
घाट व लहान नद्यांच्या परिसरात अचानक पूर (Flash Flood) व भूस्खलनाचा धोका असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
पूर्व तयारी व उपाययोजना :
सर्व जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष २४x७ कार्यरत ठेवणार.
शहरांमध्ये पाणी उपसा पंप व आवश्यक यंत्रणा तैनात करण्यात येणार.
विज व रस्ते पायाभूत सुविधांची पाहणी करून दुरुस्ती पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत.
धरण नियंत्रणावर विशेष लक्ष देण्याचे आदेश.
नागरिकांपर्यंत सूचना पोहोचवण्यासाठी SMS व सोशल मीडियाचा वापर केला जाणार आहे.
नागरिकांसाठी सूचना :
हवामान विभागाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे.
धोका असलेल्या भागात जाणे टाळावे.
पूरप्रवण क्षेत्रांपासून दूर राहावे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने प्रशासन सतर्क आहे व नागरिकांना दक्ष राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment
0 Comments