खोपोली (परमेश्वर भि कट्टीमणी) – खालापूर तालुक्यातील सावरोली येथील टाटा स्टील कंपनीत कामगारास मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे. या मागणीसाठी खालापूरातील सर्व पक्षीय नेत्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष दीपक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनाचा इशारा दिला आहे.
सावरोली ग्रामपंचायतीतील टाटा स्टीलच्या कामगारकडे येणाऱ्या ठेकेदारांनी मानसिक त्रास देत अनेक वर्षांपासून कामगारावर दबाव आणला, असे आरोप आहेत. यामुळे कामगारांचे आरोग्य व मानसिक स्थिती बिघडल्याची माहिती मिळाली आहे. या संदर्भात ठेकेदार अभिषेक कुमार झा यांनी कामगारांना सतत त्रास दिल्याचे सांगितले जात आहे.
सर्व पक्षीय नेत्यांनी ठेकेदाराविरुद्ध तातडीने कारवाई करण्याची मागणी केली असून, सदर कामगाराला न्याय मिळावा यासाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आंदोलनात खोपोली शहराध्यक्ष किशोर साळुंकें, दीपक गायकवाड, राजू गायकवाड, रजत सूरवे, दिनेश जाधव यांसह इतर नेते सहभागी आहेत.
सर्व पक्षीय नेत्यांनी ठेकेदाराविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करून न्याय मिळविण्यासाठी प्रशासनाकडे मागणी केली आहे आणि कामगारांच्या हक्कासाठी लढाई सुरू असल्याचे सांगितले आहे.


Post a Comment
0 Comments