खोपोली :( परमेश्वर भि कट्टीमणी): आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खोपोली प्रभाग क्रमांक ५ मध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. यामध्ये माजी नगरसेवक कैलासभाऊ गायकवाड यांनी पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरावे, अशी ठाम मागणी स्थानिक नागरिकांसह तरुणाईतून होत आहे.
कैलासभाऊ गायकवाड हे खोपोली शहरात विकासाभिमुख नेतृत्व म्हणून ओळखले जातात. नगरसेवक म्हणून त्यांच्या कार्यकाळात विविध विकासकामे राबवून त्यांनी नागरिकांचा विश्वास संपादन केला. शिक्षण, सामाजिक उपक्रम, क्रीडा तसेच सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला असून त्यामुळे त्यांचे नाव प्रत्येक घराघरात पोहोचले आहे.
विशेष म्हणजे, शैक्षणिक संस्थांशी जवळचा संबंध ठेवून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी केलेले त्यांचे प्रयत्न उल्लेखनीय ठरले आहेत. साधा स्वभाव, लोकांशी जिव्हाळ्याचे नाते, तसेच समाजातील सर्व घटकांशी चांगले संबंध यामुळे प्रभागातील नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विशेष आत्मीयता आहे.
यामुळेच प्रभागातील अनेक युवकांनी त्यांना आगामी निवडणुकीत उमेदवारी मिळावी, अशी मागणी केली आहे. "गायकवाड हेच आमचे खरे प्रतिनिधी," असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे प्रभाग ५ मध्ये त्यांच्या उमेदवारीला मोठा पाठिंबा मिळेल, असा अंदाज राजकीय वर्तुळात वर्तवला जात आहे.

Post a Comment
0 Comments