Type Here to Get Search Results !

न्याय, सहकार्य आणि समाजहितासाठी सदैव पुढे – रामदासजी आठवले साहेबांसोबत प्रेरणादायी भेट - तुषार तानाजी कांबळे





           प्रतिनिधी: कलानगर, बांद्रा येथील कार्यालयात माननीय केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांची भेट घेतली. ही भेट समाजहित, न्याय, उद्योजकता आणि परस्पर सहकार्य यांसाठी आयोजित करण्यात आली होती. सदर भेट तुषार तानाजी कांबळे, सचिव – महाराष्ट्र प्रदेश, आरपीआय (आठवले) श्रमिक ब्रिगेड यांच्या प्रयत्नातून आणि पुढाकाराने शक्य झाली.

 



                    न्यायासाठी धावून जाणारे नेतृत्व

         डायरेक्टर काळूराम ढोबळे यांच्यावर अन्याय झाल्याची माहिती मिळताच साहेबांनी क्षणाचा विलंब न करता संपर्क साधून मदतीस सुरुवात केली. त्यांनी स्पष्ट सांगितले – “पोलीस प्रशासन, शासन यंत्रणा आणि रिपब्लिकन कार्यकर्त्यांकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल.” समाजातील प्रत्येक घटकासाठी न्याय मिळवून देण्याची त्यांची निःस्वार्थ बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित झाली.


       

                        उद्योजकतेला नवे बळ

         लोणावळ्याचे सुप्रसिद्ध उद्योजक सुरेश तापकिर यांना घेऊन साहेबांची भेट झाली. त्यांनी त्यांच्या लोणावळा चिक्की व जेली चॉकलेट साहेबांस अर्पण केले. साहेबांनी आनंदाने स्वीकार करत व्यवसायाच्या अडचणींवर संवाद साधला. “कधी काही मदत लागली तर शासनाकडून किंवा आमच्याकडून सांगा, नक्कीच मदत करू,” या त्यांच्या शब्दांतून उद्योजकतेला नवे बळ मिळाले.



                स्वावलंबी मराठी उद्योजकतेला पाठबळ

       जितेश पाटील, टेलेक्स एडव्हर्टाइजमेंट कंपनीचे मालक, यांच्याशी चर्चेतून उद्योजकतेला नवे मार्ग सुचले. मुंबई रेल्वे, एमएमटी बस, बेस्ट बस आणि होर्डिंग ऍडव्हर्टाइजमेंट क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या या मराठी उद्योजकाला साहेबांनी शासन आणि वैयक्तिक स्तरावर सहकार्य करण्याचा शब्द दिला.


                तुषार तानाजी कांबळे यांच्या कडून प्रेरणादायी विचार

        “माननीय रामदासजी आठवले साहेब हे केवळ राजकीय नेतृत्व नाहीत – ते समाजाचे आधारस्तंभ, न्यायासाठी धावून जाणारे योद्धा आणि प्रत्येक गरजूच्या पाठीशी उभे राहणारे मार्गदर्शक आहेत.

        समाजासाठी, उद्योजकांसाठी आणि अन्यायग्रस्तांसाठी सदैव उभे राहणारे, कोणत्याही परिस्थितीत सोबत राहणारे नेतृत्व म्हणजे रामदासजी आठवले साहेब होय. त्यांच्या धडाडीने आणि सेवाभावाने अनेकांचे मनोधैर्य वाढते.

       उद्योजक असो वा सामान्य नागरिक – प्रत्येकासाठी त्यांच्या नेतृत्वाचा आधार मिळतो. अशा नेतृत्वाखाली काम करणे, समाजहितासाठी पुढे येणे आणि प्रत्येकाला न्याय मिळवून देणे हे माझ्यासाठी अभिमान आणि प्रेरणेचे स्रोत आहे. एकजूट, विश्वास आणि सहकार्य यावर आधारित नवा समाज घडवू या!”

Post a Comment

0 Comments