प्रतिनिधी: (शिवाजी जाधव) खोपोली शहरातील लोकप्रिय, प्रामाणिक व सर्वसामान्यांमध्ये मिसळून जाणारे नेते म्हणून ओळखले जाणारे खोपोली नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तसेच शिवसेना मावळ लोकसभा मतदारसंघाचे सहसंपर्कप्रमुख श्री. सुनील भाऊ पाटील यांचा वाढदिवस उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला.
या निमित्ताने शहरातील नागरिक, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, शिवसेना कार्यकर्ते, युवा वर्ग तसेच ज्येष्ठ नागरिक यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अनेकांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या दीर्घायुष्य आणि यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
श्री. सुनील भाऊ पाटील यांनी नगराध्यक्ष म्हणून काम करत असताना खोपोली शहरातील पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, शिक्षण, आरोग्य अशा विविध विकासकामांवर विशेष भर दिला. सर्वसामान्य नागरिकांना मदतीचा हात देणारे आणि समस्यांवर तत्काळ उपाय शोधणारे नेतृत्व म्हणून त्यांनी खोपोलीत एक वेगळा ठसा उमटवला आहे.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात आणि परिसरात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह आणि जोश निर्माण झाला असून सर्वानी त्यांना येणाऱ्या काळात उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि जनतेची अखंड सेवा करण्याची ताकद लाभो, अशी प्रार्थना केली.




Post a Comment
0 Comments