Type Here to Get Search Results !

ठाण्यात लहुजी वस्ताद साळवे स्मारकाला तुषार तानाजी कांबळे यांची भेट;




"अखंड महाराष्ट्रात अशा स्मारकांची उभारणी व्हावी" – तुषार तानाजी कांबळे,

सचिव – महाराष्ट्र प्रदेश (आरपीआय आठवले)


ठाणे :

ठाणे येथील कोपरी पूर्ण येथे आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे भव्य स्मारक उभारले गेले असून, या स्मारकाला भेट दिली असता महाराष्ट्र प्रदेश सचिव, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) श्रमिक ब्रिगेड तुषार तानाजी कांबळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.


यावेळी ते म्हणाले, “लहुजी वस्ताद साळवे यांच्या क्रांतिकारी कार्याचा वारसा जतन करणारे हे स्मारक समाजाला प्रेरणा देणारे आहे. प्रत्येक मातंग समाजातील व्यक्तीने या स्मारकाला एकदा तरी भेट द्यावी, कारण हे स्मारक केवळ इतिहास नव्हे तर आत्मसन्मान आणि क्रांतीची प्रेरणा देणारे आहे.”


हा मतदारसंघ तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा असून, हे स्मारक त्यांच्या विकास निधीतून उभारले गेले आहे. विशेष म्हणजे, या स्मारकाची मागणी शिवसेना प्रणित शिवलहू सेना महाराष्ट्र राज्य समन्वयक संतोष भाऊ सगट यांनी केली होती व त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच ही मागणी यशस्वी झाली आहे.


या भेटीदरम्यान संतोष भाऊ सगट यांच्यासह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) मातंग आघाडी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सुनिल भाऊ शिंदे देखील उपस्थित होते.


शेवटी तुषार तानाजी कांबळे यांनी ठाम भूमिका मांडली की, “लहुजी वस्ताद साळवे हे केवळ एका समाजापुरते मर्यादित नसून संपूर्ण राष्ट्राचे प्रेरणास्थान आहेत. त्यामुळे असे स्मारक फक्त ठाणेपुरते मर्यादित न राहता अखंड महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि शहरात उभारले गेले पाहिजे.”


– तुषार तानाजी कांबळे

महाराष्ट्र प्रदेश सचिव, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)

Post a Comment

0 Comments