खोपोली शहरात पिण्याच्या पाण्याची टाकी दुरुस्ती करण्यासाठी नगर परिषदेमार्फत एक महिन्याकरिता पिण्याचे पाणी फक्त एकच वेळ येईल अशी दवंडी पेटवून टाकी दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले होते. परंतु आता तीन महिने उलटून गेले तरीही नगर परिषदेमार्फत पाणी पुरवठा नियमित सुरू करण्यात आलेला नाही त्यामुळे शहरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
एक महिन्याचे काम तीन महिन्यावर ढकलून सुद्धा नगर परिषदेमार्फत नागरिकांच्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. खोपोली शहराचे मुख्याधिकारी तथा प्रशासक नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करतात अशी शहरातील नागरिकांची तक्रार आहे.
पिण्याचे पाण्याची गंभीर समस्या असून, साफसफाई व इतरही समस्यांमुळे शहरात नागरिक मरण यातना सहन करत आहे असे आम आदमी पार्टी प्रदेश संघटन सचिव डॉ. पठाण यांनी सांगितले.
नगरपरिषद कर वसुलीसाठी मोहीम राबवते परंतु नागरिकांच्या समस्या सोडवण्याकरिता कोणत्याही प्रकारे मोहीम राबवत नाही "सुविधा नाही तर कर नाही" अशी मोहीम नागरिकांनीच हाती घ्यावी असे आम आदमी पार्टी खोपोली शहराध्यक्ष ग्यासुद्दीन खान यांनी सांगितले

Post a Comment
0 Comments