खोपोली - शहरात मागील चार दिवसापासून पासुन जोरदारा पाऊस पडत आहे. आज तर हवामान विभागाने रायगड जिल्ह्यात अती मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली असून रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे शाळांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शहरात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचले असून खोपोली नगरपरिषद आपत्कालीन व्यवस्था सज्ज आहे. तरी विनाकारण नागरिकांनी घरा बाहेर पडू नये याबाबत प्रशासनाने नागरिकांना सांगितले आहे.
*शिळफाटा येथील डी. सी नगर मध्ये सुद्धा मुख्य रोड वर पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचले आले. त्यामुळे गरज असेल तरच घरा बाहेर पडा व डी. सी नगर रस्त्याचा वापर करू नका असे आवाहन येथील पत्रकार शिवाजी जाधव यांनी प्रभाग क्रमांक 10 मधील नागरिकांना केले आहे..*


Post a Comment
0 Comments