Type Here to Get Search Results !

कामगार नेते रामभाऊ पवार यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा

    



       खोपोली -(शिवाजी जाधव )- खोपोली नगरीतील प्रसिद्ध कामगार नेते तथा भारतीय जनता पक्ष  प्रणित राष्ट्रीय एकजूट कामगार संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष रामभाऊ पवार यांचा वाढदिवस शासकीय दाखले व नव मतदार नोंदणी शिबीर असा समाजउपयोगी उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. खोपोली नगरीत नेहमीच सर्वसामान्यांच्या आदी अडचणी जाणून घेऊन त्यांना मदत करणे, कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी कंपनी प्रशा सनासोबत थेट लढा देऊन त्या समस्या सोडविण्यात अग्रेसर असणारे व्यक्तिमत्व म्हणजे रामभाऊ पवार. त्यांचे कार्य खोपोली नगरी पुरतेच मर्यादित न रहाता खालापूर तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्यात विस्तारले आहे. कामगार क्षेत्रातील त्यांच्या कामाचा धडाका पाहून भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना भारतीय जनता पक्ष प्रणित राष्ट्रीय एकजूट कामगार संघटनेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदी नियुक्ती केली. त्यांचे कार्य आता थेट राज्यपातळीवर सुरु झाले.

 

         अशा सामाजिक बांधिलकी जपत राजकीय क्षेत्र राखत कामगार लढा देत जीवनाची यशस्वी घोडदौड करत असताना आपले समजाप्रतीच देण देण्याच्या नात्याने दरवर्षी त्यांचा वाढदिवस विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात येतो. आजचा वाढदिवससुद्धा त्यांचा असाच समाजउपयोगी उपक्रम राबवीत साजरा करण्यात आला. खालापूर तहसील कार्यालय यांच्या माध्यमातून हनुमान मित्र मंडळ सभागृहात विविध शासकीय शासकीय दाखल्याणसह नव मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात शेकडो नागरिकांनी विविध योजणांचा लाभ घेतला.



    रामभाऊ पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित समाजउपयोगी उपक्रमाचे सर्वांनी कौतुक करतानाच त्यांना शुभेच्छा देण्यासाठी खोपोली नगर परिषद चे मा नगरसेवक अविनाश तावडे, सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ नेते चंद्राप्पा अनिवार,युवा उद्योजक विक्रम साबळे, युवा नेते सचिन मोरे, भारतीय जनता पार्टी खोपोली शहर अध्यक्ष राहुल जाधव, भारतीय जनता पार्टी महिला अध्यक्षा अश्विनी अत्रे, शीळ फाटा व्यापारी अध्यक्ष राजेंद्र फक्के,सुर्वे, पत्रकार तय्यब खान,  शिवाजी जाधव, आकाश जाधव, सचिन यादव व राजकीय, सामाजिक, कामगार, व्यापारी क्षेत्रातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments