Type Here to Get Search Results !

निवडणूक अधिकाऱ्यांचे अजब उत्तर




आपच्या पदाधिकाऱ्यांना दोन मतदान ओळखपत्र असलेल्या मतदारांकडून फॉर्म 7 भरून घेवून या असे सांगितले.



खोपोली शिळफाटा येथील प्रभाग क्रमांक दहा येथील 5 मतदार यादीतील 4500 ते 5000 मतदारांपैकी 140 मतदारांचे मतदार यादी मध्ये दोन वेळा नाव आहे व सदर याद्या दुरुस्त करण्याबाबत खालापूर तहसीलदार व निवडणूक अधिकारी यांना निवेदन देण्यात आलेले आहे. 


खालापूर निवडणूक अधिकारी नायब तहसीलदार भोईर यांच्यामार्फत आम आदमी पार्टी प्रदेश संघटन सचिव डॉ पठाण व पदाधिकाऱ्यांना आपण सदर मतदारांचे फॉर्म नंबर सात भरून आमच्याकडे आणून द्या असे उत्तर देण्यात आले होते. फॉर्म नंबर 7 भरून घेणे हे काम निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांनी नेमणूक केलेल्या बूथ लेवल ऑफिसर ( BLO) यांचे आहे व त्यांनी सर्व मतदार याद्या तपासून दुरुस्त करावे व दोन मतदान ओळखपत्र असलेल्या मतदारांचे एक ओळखपत्र रद्द करण्यात यावे तसेच स्थलांतरित, मयत  असलेल्या मतदारांचे नाव मतदारयादीतून रद्द करण्यात यावे अशी आम आदमी पार्टी तर्फे मागणी करण्यात आलेली आहे.

Post a Comment

0 Comments