Type Here to Get Search Results !

"खालापूर तालुक्यात परिवर्तन विकास आघाडीचा प्रचार जोरात; साजगाव येथे भव्य सभा"

 



             खालापूर – परमेश्वर भि कट्टीमणी :-राज्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे वातावरण तापले असताना खालापूर तालुक्यात परिवर्तन विकास आघाडीने प्रचाराला वेग दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि शेतकरी कामगार पक्ष यांच्या संयुक्त परिवर्तन विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून, त्यांच्या प्रचारार्थ मंगळवारी (३ फेब्रुवारी) साजगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर भव्य प्रचारसभा पार पडली.


 


             जिल्हा परिषदेसाठी श्रद्धा अंकित साखरे, अत्तर ग्रामपंचायत समितीसाठी दिव्यानी देशमुख तर खानाव पंचायत समितीसाठी भूषण पाटील हे उमेदवार मैदानात असून, त्यांना जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.




          या सभेला खासदार सुनील तटकरे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे नेते नितीन सावंत, खोपोली नगर परिषदेचे नगरसेवक डॉ. सुनील पाटील, दत्ताजी मसुरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दिवंगत नेते अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली




        सभेत बोलताना नेत्यांनी कर्जत नगरपालिकेतील परिवर्तन विकास आघाडीच्या यशाचा उल्लेख करत, त्याच धर्तीवर खानाव आणि खालापूर तालुक्यातही परिवर्तन निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला. जनतेच्या प्रश्नांसाठी काम करणाऱ्या उमेदवारांना मतदारांनी मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Post a Comment

0 Comments