खोपोली | प्रतिनिधी : (शिवाजी जाधव)
खोपोली नगरपरिषदेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी आमदारांचे खंदे समर्थक तसेच शहरातील सुप्रसिद्ध व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते, सुरभी ज्वेलर्सचे संचालक श्री. दिनेश थोरवे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे खोपोली शहराच्या राजकीय व सामाजिक वर्तुळात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
श्री. थोरवे हे गेल्या अनेक वर्षांपासून खोपोली शहरात सामाजिक, धार्मिक व विकासात्मक कार्यात सक्रियपणे कार्यरत आहेत. गरजू नागरिकांना मदत, विविध सामाजिक उपक्रम, तसेच शहराच्या विकासासंबंधी प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारा नेतृत्वशील चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड झाल्याचे मानले जात आहे.
त्यांच्या निवडीबद्दल नागरिक, व्यापारी वर्ग, युवक कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संघटनांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ही निवड शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारी ठरेल, असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला आहे.
या निवडीच्या पार्श्वभूमीवर न्यूज जर्नलिस्ट असोसिएशन व व्हॉइस ऑफ मीडिया खालापूर तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने श्री. दिनेश थोरवे यांचे पुष्पगुच्छ देऊन व शुभेच्छा देत हार्दिक अभिनंदन करण्यात आले. यावेळी पत्रकार बांधव व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वतःच्या निवडीबद्दल प्रतिक्रिया देताना श्री. दिनेश थोरवे म्हणाले की, “खोपोली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि पारदर्शक कारभारासाठी मी नेहमीप्रमाणे प्रामाणिकपणे काम करत राहीन.”



Post a Comment
0 Comments