प्रभाग क्रमांक 1 ग्यासुद्दीन खान,प्रभाग 10 ब वैशाली वाघमारे, प्रभाग 10 क मधून डॉ रियाज पठाण यांनी केले अर्ज.
खोपोली : (प्रतिनिधी) : आगामी खोपोली नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आम आदमी पार्टी आघाडीवर असून पक्षाच्या तीन उमेदवारांनी खोपोली नगरपरिषद निवडणूक 2025 करिता नामांकन अर्ज दाखल केले आहेत.
पक्षाने या आधीच खोपोली शहरात उत्तम असे सामाजिक कार्य करून आपली छाप निर्माण केलेली आहे. नागरिकांनी संधी दिल्यास आम्ही संधीचे सोनं करू व खोपोली शहराचं नाव जगात रोशन करू असे आम आदमी पार्टी प्रदेश संघटन सचिव डॉ. पठाण यांनी सांगितले.
वासरंग येथील प्रभाग क्रमांक एक मधून शहराध्यक्ष ग्यासुद्दीन खान यांनी नामांकन अर्ज दाखल केले असून, शिळफाटा येथील प्रभाग क्रमांक दहा ब मधून सामाजिक कार्यकर्त्या वैशाली वाघमारे यांनी अर्ज दाखल केले आहेत.



Post a Comment
0 Comments