Type Here to Get Search Results !

"राष्ट्रीय एकता दिनानिमित्त खोपोली पोलिस ठाण्याच्यावतीने ‘रन फॉर युनिटी’चे आयोजन"

 

          नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग — समाजात ऐक्यतेचा संदेश


         खोपोली / प्रतिनिधी :राष्ट्रीय एकता दिनानिमित्त 31 ऑक्टोबर 2025 रोजी खोपोली पोलिस ठाण्याच्यावतीने ‘रन फॉर युनिटी’ अर्थात एकता दौड या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. देशातील सर्व नागरिकांमध्ये ऐक्य, सलोखा आणि राष्ट्रभावनेचा संदेश पोहोचविण्याच्या उद्देशाने ही दौड आयोजित करण्यात आली होती.

 



          या उपक्रमाचा शुभारंभ खोपोली पोलिस ठाण्यातून करण्यात आला. शहरातील विविध भागांतून नागरिक, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते तसेच पोलिस अधिकारी मोठ्या उत्साहात सहभागी झाले. ठिकठिकाणी नागरिकांनी दौडचे स्वागत फुलांच्या वर्षावाने आणि घोषणाबाजीने करत देशभक्तीचा माहोल निर्माण केला.


         कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत खालापुर विभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल नेहुल यांनी सहभाग घेतला. त्यांनी मनोगतात म्हटले की, “राष्ट्राची खरी ताकद एकतेत आहे. समाजातील प्रत्येक घटकाने एकमेकांप्रती बंधुत्व आणि सहिष्णुता जोपासणे गरजेचे आहे.” त्यांनी या उपक्रमाद्वारे राष्ट्रीय ऐक्यतेचा संदेश अधिक दृढ करण्याचे आवाहन केले.


      या उपक्रमात सहभागी झालेल्यांनी पांढऱ्या रंगाची टी-शर्ट, ट्रॅक पॅन्ट व शूज परिधान करून विशेष ड्रेसकोड पाळला होता. कार्यक्रमात खोपोलीतील नागरिक, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, करिअर कोचिंग क्लासचे विद्यार्थी-विद्यार्थिनी, हेल्प फाउंडेशन, पोलिस मित्र संघटना तसेच पत्रकार बांधव यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.


         रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले. तर खोपोली पोलिस ठाण्याचे निरीक्षक सचिन हिरे यांच्या पुढाकाराने संपूर्ण कार्यक्रम अत्यंत.

Post a Comment

0 Comments